अभिनयाचे शेहेनशाह अमिताभ बच्चन व मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मराठी चित्रपट आणि एकूणच चित्रपटसृष्टीचे आकर्षण ठरलेले नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा पहिला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहेत. अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे हे दोन प्रतिभावंत कलाकार या चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र आले असल्यानं ‘झुंड’बद्दल लोकांच्या मनात उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वीच ‘झुंड’चं चित्रीकरण पार पडलं.

या चित्रपटाच्या निर्मात्या सविता हिरेमथ यांनी या दोन दिग्गज कलाकारांना एकत्र आणले आहे. ‘खोसला का घोसला’ या सुपरहिट चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. एका मुलाखतीत त्यांनी हे दोन कलाकार एकत्र कसे आले यामागची गोष्ट सांगितली. त्या स्वतः नागराज मंजुळेंना भेटण्यासाठी पुण्याला गेल्या होत्या. मंजुळेंशी बोलताना त्यांच्या लक्षात आले की, ते बिग बी यांचे मोठे चाहते आहेत. हिरेमथ यांनी नागराज मंजुळेंना सांगितले की, “तुमचा होकार असेल तर, मी अमिताभ बच्चन यांच्याकडे चित्रपटाचा प्रस्ताव मांडू शकते.” त्यांच्या होकारानंतर हिरेमथ यांनी बिग बी यांच्याकडे प्रस्ताव मांडला. नंतर अमिताभ बच्चन यांनी सैराट बघितला व या चित्रपटासाठी होकार कळवला.

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Raj Thackeray, mahayuti support
राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

‘झुंड’ हा चित्रपट विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विजय यांनी झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देत त्यांची फुटबॉल टीम बनवली. त्यांच्या याच कथेवर हा चित्रपट आधारित आहे. अनेक अडचणींनंतर अखेर ‘झुंड’चं शूटिंग नागपूरमध्ये अखेर सुरळीत पार पडलं. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर झाली असून २० सप्टेंबर २०१९ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.