News Flash

‘सैराट’नंतर पुन्हा एकत्र येणार ‘ही’ जोडी

जाणून घ्या त्यांच्या आगामी चित्रपटाविषयी

२९ एप्रिल २०१६ रोजी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या चित्रपटाने सबंध महाराष्ट्राला याड लावलं. या चित्रपटातलं प्रत्येक गाणं आणि संवाद सुपरहिट ठरले. त्यासोबतच यातील कलाकार मंडळींनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. आर्ची, परश्या, सल्या आणि लंगड्या या भूमिका साकारणाऱ्या नवोदित कलाकारांनी पहिल्याच चित्रपटातून त्यांच्यातील अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली. विशेष म्हणजे या चित्रपटातील एक जोडी पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करण्यास सज्ज असल्याचं दिसून येत आहे.

आयुष्याच्या वळणावर अनेक माणसं आपल्याला भेटत असतात. मात्र, यात मैत्रीचं नात फार कमी जणांशी जोडता येतं. हेच मैत्रीचं नात सैराट चित्रपटात सल्या आणि लंगड्या यांच्यात पाहायला मिळालं. परशाला त्याचं प्रेम मिळवून देण्यासाठी या दोघांनी केलेली धडपड प्रेक्षकांच्या लक्षात आहे. विशेष म्हणजे सल्या आणि लंगड्याची ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यास सज्ज आहेत.

सुनील मगरे यांच्या फ्री हिट दणका या चित्रपटामध्ये सल्या आणि लंगड्या म्हणजेच अरबाज व तानाजी स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटामध्येदेखील त्यांची भन्नाच मैत्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा उमेश नरके, धर्मेंद्र सिंग, प्रसाद शेट्टी, विकास कांबळे, प्रवीण जाधव यांनी सांभाळली आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असून हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 2:39 pm

Web Title: nagraj manjule marathi movie sairat cast arbaaj and tanaji aka sallya and langadya new marathi movie ssj 93
Next Stories
1 भारतीय जाहिरात पाहून ‘अंडरटेकर’ झाला भावूक; ‘डेडमॅन’लाही अश्रू अनावर
2 रोजगार योजनेत कोट्यवधींचा घोटाळा; प्रसिद्ध संगीतकाराला झाली अटक
3 डिजिटल विश्वात पदार्पण करण्यासाठी कपिल शर्मा घेणार इतके कोटी?
Just Now!
X