दिग्दर्शक- अभिनेता नागराज मंजुळे व झी स्टुडिओज यांची प्रस्तुती असलेला ‘नाळ’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पहिल्या सात दिवसांतच सर्वत्र हाऊसफुल्लचे बोर्ड झळकावत तब्बल चौदा कोटींची विक्रमी कमाई केली. तर आता दुसऱ्या आठवड्यात ४.५० कोटी रुपयांची भर पडली आहे. सुधाकर रेड्डी दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत १८.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने कमाईसंदर्भातली ही माहिती दिली आहे. ‘पैसा कमवून देणारा हा चित्रपट ठरतोय,’ असं त्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे. मराठी व्यतिरिक्त इतर भाषिकांना आकर्षित करण्यासाठी झी स्टुडिओने बेंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, सुरत, वडोदरा आणि चेन्नई या शहरांमध्येही चित्रपट प्रदर्शित केल्याची माहिती तरणने दिली आहे.
#Marathi film #Naal is a moneyspinner…
Week 1: ₹ 14 cr
Weekend 2: ₹ 4.50 cr
Total: ₹ 18.50 cr
To attract non-Marathi viewers, Zee Studios have released the film at prominent cities across India [#Bengaluru, #Hyderabad, #Delhi, #Surat, #Vadodara and #Chennai] with subtitles.— taran adarsh (@taran_adarsh) November 27, 2018
मुंबई पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि इतर शहरांमध्येही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोशल नेटवर्क साइट्सवरूनही चित्रपटाबद्दल, लहानग्या चैतूच्या म्हणजेच श्रीनिवास पोकळेच्या अभिनयाबद्दल प्रेक्षक भरभरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
वाचा : ”तुला पाहते रे’ महाराष्ट्रासाठी घातक, मालिका बंद करा’
चित्रपटाच्या यशाबद्दल नागराज मंजुळे म्हणतात, ‘सर्वसामान्य माणसांचं जगणं रूपेरी पडद्यावर मांडणाऱ्या, लोकभाषेत अभिव्यक्त होणाऱ्या एका साध्या तरीही तरल कथेला प्रेक्षकांनी दिलेला हा उदंड प्रतिसाद म्हणजे रसिकांच्या अभिरुची संपन्नतेची पावती आहे. मराठीमध्ये चांगल्या सिनेमाच्या पाठिशी प्रेक्षक नेहमी उभा राहतो हे या यशामधून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. यासाठी मी महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचे आभार तर मानेनच पण त्यांच्या सुजाण अभिरुचीचेही अभिनंदन करीन.’
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2018 1:54 pm