08 August 2020

News Flash

झी टॉकीजवर येत्या रविवारी उघडणार ‘नागराजचा पिटारा’

नागराजच्या ३ शॉर्टफिल्म्स प्रदर्शित होणार आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीला दर्जेदार सिनेमा देऊन प्रेक्षकांना याड लावणारे दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. नागराज यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांनी इतिहास रचला आहे. त्यांच्या ‘सैराट’ या चित्रपटाने तर १०० कोटींचा आकडा देखील पार केला. राष्ट्रीय पुरस्कार विजेते असलेले नागराज यांची एक संवेदनशील दिग्दर्शक म्हणून ओळख निर्माण झाली आहे. उत्कृष्ट चित्रपटांसोबतच नागराज यांनी तितक्याच उत्तम शॉर्टफिल्म्स देखील बनवल्या आहेत.

नागराज यांच्या ३ शॉर्टफिल्म्स झी टॉकीज वाहिनीवर पहिल्यांदाच प्रदर्शित होणार आहेत. येत्या रविवारी १९ जुलै रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता नागराज यांच्या शॉर्टफिल्म्स ‘नागराजचा पिटारा’ मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतील. नागराज यांच्या या पिटाऱ्यात ‘पावसाचा निबंध’, ‘बिबट्या – द लेपर्ड’ आणि ‘पायवाट’ या तीन शॉर्टफिल्म प्रेक्षकांच्या भेटीस येतील.

‘पावसाचा निबंध’ ही शॉर्टफिल्म नागराज यांनी दिग्दर्शित केली आहे. जेव्हा नागराज फॅन्ड्री या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते तेव्हा पावसामुळे चित्रीकरण थांबवावे लागले होते. त्यावेळी नागराज यांना आपल्या बालपणीची आठवण झाली आणि त्यातूनच या शॉर्टफिल्मची कथा त्यांना मिळाली.

कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झालेली ‘बिबट्या’ ही शॉर्टफिल्म नागराज यांनी प्रस्तुत केली असून या शॉर्टफिल्मची कथा एका बिबट्या शिरलेल्या गावावर आधारित आहे. बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी संपूर्ण गावकरी हे घरीच असताना एक मुलगी हरवते आणि तिला शोधण्यासाठी स्वतःचा जीव मुठीत घेऊन गावकरी घराबाहेर पडतात. त्या बिबट्याला पकडण्यासाठी गावकरी काय करतात हे या कथेमध्ये दर्शवले आहे.

‘पायवाट’ ही शॉर्टफिल्म देखील नागराज यांची प्रस्तुती असून ही कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. या लघुपटाला नॅशनल अवॉर्ड देखील मिळाला. या लघुपटाची कथा एका गावातील मुलीवर आधारित आहे जी रोज खूप मोठं अंतर पार करत शाळेत चालत जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 3:02 pm

Web Title: nagraj manjule short film streaming on zee talkies on sunday avb 95
Next Stories
1 ‘मिस्टर इंडिया’ बनून लढायचंय चीनशी; लहान मुलीच्या अजब मागणीवर दिग्दर्शकाचं गजब उत्तर
2 प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी; ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होणार १७ नवे चित्रपट
3 “याला म्हणतात देशभक्ती”, रणदीप हुड्डाने कौतुक केलेल्या व्यक्तीचं काम पाहून तुम्हीही भारावून जाल
Just Now!
X