05 December 2020

News Flash

नागराज मंजुळे झाले पोस्टमन; घेऊन येतायेत प्रेक्षकांसाठी ‘तार’

नागराज मंजुळे यांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा; पोस्टर होतोय व्हायरल...

राष्ट्रीय पुरस्कार विजेते नागराज मंजुळे हे मराठी सिनेसृष्टीतील एक नामांकित दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. ‘सैराट’, ‘फँड्री’, ‘हायवे’, ‘नाळ’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणारे नागराज आता एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या आगामी चित्रपटाचं नाव ‘तार’ असं आहे. एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली.

अवश्य पाहा – “जातिनिहाय आरक्षण बंद करा”; कंगना रणौतची सरकारकडे मागणी

अवश्य पाहा – “माफी माग अन्यथा मानहानिचा दावा ठोकेन”; महेश भट यांच्या सुनेला अमायराचा इशारा

‘तार’ हा एक लघुपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन पंकज सोनावणे करणार आहेत. तर नागराज मंजुळे एक अभिनेता म्हणून चाहत्यांच्या भेटीस येत आहेत. नुकतेच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं. या पोस्टरमध्ये नागराज लोकांची पत्र पोहोचवणाऱ्या एका पोस्टमनच्या भूमिकेत दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर ते या चित्रपटात पोस्टमनची व्यक्तिरेखा साकारताना दिसतील अशी शक्यता आहे. शिवाय भुषण मंजुळे, भुषण हंबे, विवेक जांबळे, पूजा डोळस या नामांकित कलाकारांनीही चित्रपटात काम केलं आहे. लक्षवेधी बाब म्हणजे याच कलाकारांसोबत नागराज यांनी सैराट आणि फँड्री सारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2020 2:05 pm

Web Title: nagraj manjule upcoming film tar mppg 94
Next Stories
1 बॉलिवूड अभिनेता देतोय मृत्यूशी झुंज; उपचारासाठी मागतोय १० लाखांची मदत
2 KGF 2: रवीना टंडन साकारणार ‘ही’ भूमिका
3 ‘…तेव्हा सगळ्यात जास्त आनंद आई बाबांना झाला’, भरत जाधवनं सांगितली आनंदी क्षणाची आठवण
Just Now!
X