सैराट फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘कोण होणार करोडपती’ हा शो लवकरच सोनी मराठीवर येत आहे. या गाजलेल्या गेम शोच्या नव्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेने वात पाहत आहेत. यंदाच्या पर्वाचं सूत्रसंचालन नागराज करत आहेत. मतदानाच्या दिवसाचे औचित्य साधून ते शोचे प्रमोशन आणि मतदानाबद्दल जनजागृती एकत्रच करत आहेत. त्याने नुकतेच मतदान करून झाल्यावर सर्व कुटुंब आणि मित्रपरिवारासोबतच्या फोटोसह ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ खेळल्याचे ट्विट केले आहे.

आपल्या जवळील मतदान केंद्रावर पोहोचून आपल्या आवडीच्या उमेदवारासाठीचे बटण दाबा आणि आपल्या बोटावर अभिमानाची शाई उमटवा, असेच तो नागरिकांना सुचवतोय. ‘उत्तर शोधलं की जगणं बदलतं’ अशी टॅगलाइन ‘कोण कोणार करोडपती’च्या यंदाच्या पर्वाची आहे. ‘कोण होणार करोडपती’मध्ये प्रत्यक्ष जाऊन जेव्हा तुम्ही ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ खेळाल तेव्हा त्या एका प्रश्नाचे उत्तर तुमचं जगणं बदलून टाकेल, त्याचप्रमाणे आजचे तुमचे मत म्हणजे तुमच्या नागरी समस्यांवर तुमचं जगणं बदलणारं उत्तर ठरू शकतं, असं नागराज यांनी म्हटलंय.

Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
are menstrual cups safe how they work pros and cons menstrual cup dangers safety risks and benefits
मेंस्ट्रुअल कप वापरणं खरंच सुरक्षित आहे का?तुमच्या मनातही आहेत का ‘हे’ १० प्रश्न; मग येथे वाचा उत्तरं…

‘कोण होणार करोडपती’चा ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ लवकरच सुरू होणार आहे. ‘कोण होणार करोडपती’चे हे तिसरे पर्व आहे. आतापर्यंत दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून नागराज यांना प्रेक्षकांनी पाहिलं. आता सूत्रसंचालक म्हणून ते प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या नवीन पर्वात कोणकोणते नवीन बदल असतील आणि कोणत्या नवीन लाइफलाइन्स असतील हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.