राष्ट्रीय पुरस्कारांच्या घोषणेसोबतच आजचा दिवस दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासाठी आनंद द्विगुणीत करणारा ठरला. ‘पावसाचा निबंध’ या लघुपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त होणार आहे. विशेष म्हणजे, आजच (१३ एप्रिल) या लघुपटाचा लॉस एंजेलिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर होणार आहे. ‘सैराट’ चित्रपटाच्या अफाट यशानंतर नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पावसाचा निबंध’ या लघुपटालाही चांगलंच यश मिळालं आहे.

राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा होताच फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. ‘पावसाच्या निबंधच्या नावानं चांगभलं! आजच लॉस एंजेलिस येथे पावसाचा निबंधचा वर्ल्ड प्रिमिअर होतोय आणि आजच ही आनंदाची बातमी आली. अभिनंदन टीम आटपाट,’ असं लिहित मंजुळेंनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला.

Loksatta editorial Government bans sugar mills from producing ethanol
अग्रलेख: धडाडांची धरसोड!
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर
Budh Vakri 2024
आजपासून ‘या’ ५ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? बुधदेवाच्या कृपेने उत्पन्नात होऊ शकते प्रचंड वाढ
Girl Dies After Eating Cake
१० व्या वाढदिवशी खाल्लेल्या केकने चिमुकलीचा मृत्यू, झोमॅटोची हॉटेलवर कारवाई; कुटुंबाने सांगितलं पूर्ण प्रकरण

65th national film awards : शेतकरी कुटुंबातल्या पंकज त्रिपाठीची राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर

‘पिस्तुल्या’ या लघुपटाला मिळालेल्या पारितोषिकांमुळे नागराज मंजुळे हे नाव प्रसिद्धीच्या झोतात आले. समाजजीवनाचे दर्शन घडविणाऱ्या ‘फॅन्ड्री’द्वारे मंजुळे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनामध्ये पदार्पण केले. दोन वर्षांपूर्वी झळकलेल्या ‘सैराट’ चित्रपटाने अफाट यश संपादन केले. त्यानंतर मंजुळे यांनी ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्यासमवेत चित्रपटाची जुळवाजुळव सुरू केली होती. मात्र, बच्चन यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण रखडले. त्यादरम्यान मंजुळे यांना बऱ्याच दिवसांपासून एक गोष्ट सांगायची राहिली होती ती ‘पावसाचा निबंध’ या लघुपटाद्वारे सांगितली.

पाऊस हा प्रत्येकाला वेगळा दिसतो. तो वेगळा भासतो. प्रत्येकाचा पाऊस वेगळा असतो. कधी तो आल्हाददायक असतो, तर कधी तो रौद्र रूप धारण करतो. ही संकल्पना घेऊन दीड दिवसांचा प्रवास असलेली एका कुटुंबाची किंवा एका गावची गोष्ट मी ‘पावसाचा निबंध’ या लघुपटातून मांडली आहे, असे नागराज मंजुळे यांनी सांगितले. २५ मिनिटे कालावधीच्या या गोष्टीमध्ये मेघराज शिंदे, शेषराज मंजुळे, राही मंजुळे आणि गार्गी कुलकर्णी यांच्या भूमिका आहेत. या चारही व्यक्तिरेखांचे पावसाचे आकलन या लघुपटात पाहावयास मिळेल. या लघुपटासाठी संगीत तसेच पाश्र्वसंगीताचा वापर केलेला नाही. तर, पावसाचे नैसर्गिक रूप हेच या लघुपटाचे संगीत आहे, असेही नागराज मंजुळे यांनी सांगितले.