मुंबई ‘झी टॉकीज’ वाहिनीतर्फे पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलात २ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या महाराष्ट्र कुस्ती दंगलच्या सहा संघांची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. या सहा संघांच्या मालकांमध्ये कलाकार स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचाही समावेश असल्याने कुस्तीच्या खेळात करमणुकीचे विशेष रंगदेखील भरले जाणार आहेत.

२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या दंगलीमध्ये राहुल आवारे, विजय चौधरी, अक्षय शिंदे, किरण भगत, अक्षय चोरगे, उत्कर्ष काळे, ज्ञानेश्वर जमदाडे, विष्णू खोसे या नामवंत मल्लांचा समावेश असल्याने अन्य लीगइतकीच ही मराठी दंगल यशस्वी होणार असल्याचा विश्वास संघमालकांनी व्यक्त केला.स्वप्निल जोशी (विदर्भाचे वाघ), सई ताम्हणकर (कोल्हापुरी मावळे), नागराज मंजुळे (वीर मराठवाडा), पुरुषोत्तम जाधव (यशवंत सातारा), राजेश डाके (मुंबई अस्त्र) आणि शांताराम मानवे (पुणेरी उस्ताद) हे कुस्तीच्या या महासंग्रामातील सहा संघांचे मालक आहेत.

महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील संघ

• पुणेरी उस्ताद : विनोद कुमार, राहुल आवारे, विजय चौधरी, सौरभ पाटील, विश्रांती पाटील, हनुमंत पुरी.

मुंबई अस्त्र : ललिता शेरावत, रणजीत नलावडे, अक्षय शिंदे, सागर मरकड, अक्षय हिरगुडे, संजय सूळ.

• वीर मराठवाडा : आंद्रे यातसेंको, किरण भगत, स्वाती शिंदे, दत्ता नारळे, अरुण खेंगळे, शुभम थोरात.

• यशवंत सातारा : झलिना सीदाकोवा, उत्कर्ष काळे, कौतुक डाफळे, सूरज कोकाटे, अक्षय चोरगे, आदर्श गुंड.

• कोल्हापुरी मावळे : प्रदीप कुमार, ज्योतिबा अटकळे, ज्ञानेश्वर जमदाडे, प्रसाद सस्ते, नंदिनी साळोखे, अजित शेळके.

• विदर्भाचे वाघ : इसत्वान वेरेब, सोनबा घोंगणे, विजय पाटील, विष्णू खोसे, कुमार लहू शेलार, दिशा कारंडे.