21 September 2020

News Flash

‘नकळत सारे घडले’मध्ये दिसणार नेहाचा अनोखा अंदाज

स्टार प्रवाहच्या 'नकळत सारे घडले' या मालिकेतली नेहा, अर्थात नुपूर परूळेकर आता नव्या लूकमध्ये दिसणार आहे.

नुपूर परूळेकर

स्टार प्रवाहच्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेतली नेहा, अर्थात नुपूर परूळेकर आता नव्या लूकमध्ये दिसणार आहे. डॉक्टर असलेली नेहा पुन्हा एकदा प्रॅक्टिस करताना दिसणार असून, आता साडीऐवजी पंजाबी ड्रेस ती परिधान करणार आहे.

छोट्या परीला वेळ देण्यासाठी नेहानं आपली मेडिकलची प्रॅक्टिस सोडली होती. आता पुन्हा प्रॅक्टिस करावी, स्वत:चं क्लिनिक सुरू करावं, असं तिला प्रताप सुचवतो. प्रॅक्टिस सुरू करताना साडीऐवजी छान पंजाबी ड्रेस घालत जा, असं छोटी परी नेहाला सांगते. प्रताप आणि परीच्या कल्पनेला घरच्यांकडूनही पाठिंबा मिळतो. त्यामुळे नेहा उत्साहानं पुन्हा प्रॅक्टिस सुरू करण्याचा निर्णय घेते. लग्नानंतर प्रॅक्टिसपासून दूर गेलेली, परीच्या संगोपनात रमलेली डॉ. नेहा पुन्हा क्लिनिकमध्ये येणार आहे. नेहाचा हा निर्णय तिच्यासाठी नवी सुरूवात ठरेल का, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

वाचा : अक्षयने सोडलेली ‘ही’ भूमिका आमिरच्या पदरात?

नेहाची भूमिका साकारणारी नुपूर परूळेकर नव्या लूकविषयी म्हणाली, ‘नवा लूक मिळणं ही माझ्यासाठी नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. मला हा लूक आवडला. कॅरी करायला सोपा असा हा लूक आहे. यामुळे परीची इच्छाही पूर्ण झाली. बदललेल्या लूकबरोबरच नेहा ही व्यक्तिरेखाही वेगळ्या पद्धतीनं साकारता येणार आहे. आता मालिकेत पुढे काय घडणार, नेहाचा प्रवास कसा असेल याविषयी माझ्याही मनात कुतूहल आहे.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 4:56 pm

Web Title: nakalat saare ghadle star pravah marathi serial neha changed her look
Next Stories
1 अक्षयने सोडलेली ‘ही’ भूमिका आमिरच्या पदरात?
2 सोनमच्या लग्नात ‘या’ सेलिब्रिटी पाहुण्यांची हजेरी?
3 प्रसिद्धीच्या तुलनेत कमाई काहीच नाही, रणवीरच्या वडिलांची तक्रार
Just Now!
X