News Flash

वैदर्भीय रंगकर्मीची टीव्ही मालिकेत दमदार एंट्री

सातारा, वाई, कुडाळ या परिसरात तिसऱ्या मुलीचं नाव नकुशी ठेवलं जातं.

‘नकुशी’ची भूमिका प्रसिद्धी किशोर आयलवार ही वैदर्भीय कलावंत साकारणार आहे.

‘स्टार प्रवाह’वर १० ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या ‘नकुशी’ या मालिकेने अल्पावधीतच टीव्ही रसिकांच्या मनात घर केले असून, या मालिकेत मोठ्या ‘नकुशी’ची भूमिका प्रसिद्धी किशोर आयलवार ही वैदर्भीय कलावंत साकारणार आहे.

२० ऑक्टोबरच्या भागापासून प्रसिद्धी ही ‘नकुशी’ची मुख्य भूमिका साकारणार आहे. ही मालिका स्टार प्रवाहवर रात्री १० वाजता प्रदर्शित होणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता आणि सायंकाळी ५ वाजता या भागांचे पुनर्प्रक्षेपण होणार  आहे. मूळची नागपूरकर असलेल्या प्रसिद्धीने यापूर्वी ‘ते दोन दिवस’ या चित्रपटात मुख्य व्यक्तिरेखा साकारली असून, आता ती टीव्ही मालिकेत पदार्पण करत आहे. ‘मुलगाच हवा’ या आग्रहामागे ‘मुलगी नको’ हे अलिखित विधान असतं. अशा वेळी मुलगी झाली की चक्क तिचं नावच नकुशी ठेवण्याची प्रथा ग्रामीण भागात आहे. एखाद्या व्यक्तीचं अस्तित्वच नाकारण्याच्या या अघोरी प्रकारावर बोट ठेवणारी नवी मालिका ‘नकुशी’ स्टार प्रवाहवर दाखविण्यात येत आहे.

सातारा, वाई, कुडाळ या परिसरात तिसऱ्या मुलीचं नाव नकुशी ठेवलं जातं. तिसऱ्या मुलीचं नाव नकुशी ठेवलं की चौथा मुलगा होतो अशी त्या परिसरात समज आहे. या प्रथेवर मालिकेतून भाष्य केलं जाणार आहे. या मालिकेच्या सुरुवातीच्या काही भागांचं शूटिंग वाई, सातारा याच परिसरात झालं आहे. जवळपास ४५ दिवस मालिकेची संपूर्ण टीम सातारा, वाई इथल्या गावांमध्ये राहात होती.

ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी या मालिकेद्वारे मालिकांमध्ये पदार्पण केले आहे. ‘नकुशी.. तरीही हवीहवीशी’ या मालिकेत निवेदकाची भूमिका ते साकारत असून, या निमित्तानं कीर्तनासारखा लोककला प्रकार टीव्ही मालिकेत प्रथमच वापरला जातोय. सामाजिक प्रथेवर आधारित मालिका आणि कीर्तनासारखा संगीतप्रधान कला प्रकार यांचा मिलाफ टीव्ही मालिकेत यापूर्वी झालेला नाही. आपल्या घराण्यात असलेला कीर्तनाचा वारसा चारुदत्त आफळे पुढे नेत आहेत. कीर्तनकार म्हणून आफळे यांची जगभर ख्याती आहे. तसंच संगीत रंगभूमीवर गायक अभिनेता म्हणूनही त्यांची स्वतंत्र ओळख आहे. देशाविदेशात त्यांची कीर्तने होत असतात. आफळे बुवा आपल्या कीर्तनातून सामाजिक प्रबोधन, अनिष्ट प्रथांविरोधात जागृतीही करतात. स्लाईड शोसारख्या नव्या माध्यमांचा वापर करूनही ते कीर्तने करतात. आता प्रथमच ते टीव्ही मालिकेत निवेदक म्हणून काम करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 12:28 pm

Web Title: nakushi tarihi havihavishi serial on star pravah
Next Stories
1 सोनाली आणि संदेश कुलकर्णी सोबत रंगला भाऊबीजचा खास भाग
2 सलमानसाठी लुलियाने केलेला करवा चौथ?
3 आराध्या बच्चन रणबीरला समजली बाबा!
Just Now!
X