News Flash

अभिनेत्याने तृतीयपंथी व्यक्तीकडे मागितले डान्स केल्याचे पैसे; व्हिडीओ होतोय व्हायरल…

पैसे मागायला आलेल्या तृतीयपंथीकडे अभिनेत्यानेच मागितले पैसे

‘इश्कबाज’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेमुळे नावारुपास आलेला अभिनेता नकुल मेहता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून तो कायम चर्चेत असतो. मात्र यावेळी तो चक्क एका तृतीयपंथी व्यक्तीमुळे चर्चेत आहे. नकुलने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तीसमोर डान्स केला अन् त्याच्याकडूनच पैसे मागितले.

अवश्य पाहा – सोनू सूदच्या साथीदाराला पोलिसांनी मारली होती थोबाडीत; कारण…

नकुलने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक तृतीयपंथी व्यक्ती नकुलकडे पैसे मागताना दिसत आहे. परंतु नकुलने त्याला पैसे देण्याऐवजी उलट स्वत:च डान्स करुन त्याच्याकडेच पैसे मागितले. त्याचा गंमतीशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अवश्य पाहा – नैराशावर अशी करा मात? अभिनेत्रीने एक मिनिटाच्या फिल्ममध्ये सांगितले उपाय

 

View this post on Instagram

 

NOX Baba in MASTERCLASS on life, making new friends & negotiation #feelkaroreelkaro

A post shared by Nakuul Mehta (@nakuulmehta) on

नकुल मेहता एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आहे. त्याने २०१२ मध्ये ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ (निवेदक), ‘दिल बोले ओबेरॉय’, ‘आय डोन्ट वॉच टीव्ही’, ‘नेव्हर किस युव्हर बेस्ट फ्रेंड’ यांसारख्या काही मालिकांमध्ये त्याने काम केले. या दरम्यान ‘इश्कबाज’ या मालिकेमुळे तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला होता. या मालिकेत त्याने साकारलेली ‘शिवाय सिंग’ ही व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 5:44 pm

Web Title: nakuul mehta dance for transgender viral video mppg 94
Next Stories
1 भारतीय नाट्यसृष्टीत क्रांती घडवणारे ज्येष्ठ नाट्यकर्मी इब्राहिम अलकाझी काळाच्या पडद्याआड
2 “रियासोबत युरोपला जाऊन आल्यापासून सुशांत बदलला”; माजी सहाय्यकाने केले धक्कादायक खुलासे
3 ‘अर्णब- द न्यूज प्रॉस्टिट्यूट’; संतापलेल्या राम गोपाल वर्मांनी थेट केली चित्रपटाची घोषणा
Just Now!
X