News Flash

चित्रीकरणादरम्यान अभिनेत्याला लागला विजेचा झटका अन्…

त्यानंतर लगेचच त्याला रुग्णालयात भरती केले

‘स्वरागिनी’ या लोकप्रिय मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेल्या अभिनेता नमिश तनेजा याला चित्रीकरणादरम्याम विजेचा झटका लागला आहे. या घटनेतील आवाक् करणारी बाब म्हणजे नमिश विजेचा झटका लागण्याचाच अभिनय करत होता. त्यावेळी त्याला खरोखरचा झटका बसला. त्यानंतर लगेचच त्याला रुग्णालयात भरती केले गेले.

चित्रीकरणादरम्यान नेमकं काय घडलं?

नमिश तनेजा सध्या ‘विद्या’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत नमिशला रुग्णालयात काम करत असताना विजेचा झटका लागतो. या दृष्याचे चित्रीकरण सुरु होते. दिग्दर्शकाने दिलेल्या सुचनेप्रमाणे अभिनय करत असताना त्याने वीजेच्या बटणाला हात लावला. त्यावेळी त्याला खरोखरचा झटका लागला. सुरुवातीला हे दृष्य पाहून नमिश अभिनय करत असल्याचे सर्वांना वाटले. परंतु त्यानंतर त्याला बेशुद्ध झाल्याचे पाहून खरी घटना सर्वांच्या लक्षात आली. त्यानंतर त्याला लगेचच जवळच्या रुग्णालयात भरती केले गेले. आता त्याची प्रकृती स्थीर असुन लवकरच तो या मालिकेत अभिनय करताना चाहत्यांना दिसेल. अशी माहिती फिल्मी बिट्स या वेबसाईटने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 6:20 pm

Web Title: namish taneja suffers electric shock while shooting for vidya mppg 94
Next Stories
1 रणवीरमुळे राणी मुखर्जी झाली ट्रोल, कारण…
2 सलमानचा ‘दबंग ३’ अडचणीत; सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र न देण्याची हिंदू जनजागृती समितीची मागणी
3 ‘एबीसीडी’मधील अभिनेत्रीने सांगितली व्यसनमुक्तीची कहाणी
Just Now!
X