नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘आपला मानूस’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर अजय देवगणने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. नानांसोबत सुमित राघवन, इरावती हर्षे यामध्ये झळकणार आहेत.

टीझरच्या सुरुवातीलाच एक व्यक्ती इमारतीवरून उडी मारताना पाहायला मिळतो. त्याच व्यक्तीच्या मृत्यूची चौकशी नाना करत असतात. नाना पाटेकर क्राईम ब्रांचमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारूती नागरगोजे ही भूमिका साकारत आहेत. ‘आपल्याला जमेल तेवढाच चांगुलपणा दाखवावा, आपण काय गांधी नाही’ यांसारखे दमदार संवाद टीझरमध्ये आहेत.

arbaaz khan sohail khan on relationships
“एका ठराविक काळानंतर…”, अरबाज खानचं नात्यांबद्दल स्पष्ट मत; सोहेल खान म्हणाला, “एखाद्याचा इगो दुखावणं…”
Mongoose attack on lions animal fight wildlife video viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! मुंगूसानं दिली सिंहांना टक्कर; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय
Viral Video Lionesses Attack Lion Buffalo Fight Video
VIDEO: “फक्त साथ देणारा कट्टर पाहिजे” म्हशीची शिकार करण्यासाठी सिंहीणीचा घेराव, पण…पुढे काय घडतं पाहाच

नवऱ्याच्या वडिलांसोबत राहणाऱ्या, शहरी जीवनशैलीच्या दबावाचा सामना करणाऱ्या आणि नातेसंबंधांची गुंतागुंत हाताळणाऱ्या एका तरुण दाम्पत्याची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच अजयने या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला होता. पोस्टरमध्ये एका पावसाळी रात्री नाना पाटेकर बाईक चालवताना दिसत आहेत. पोस्टरवरील ‘हा सैतान बाटलीत मावनार नाय’ ही टॅगलाईनसुद्धा लक्षवेधी ठरली. अजय देवगण या चित्रपटाचा निर्मात असून तो यामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भुमिकेत पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शत होणार आहे.