प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर आणि अभिनेत्री माही गिल यांचा ‘वेडिंग अॅनिवर्सरी’ हा चित्रपट येत्या १७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ‘वेडिंग अॅनिवर्सरी’ हा एक रोमॅण्टिक ड्रामापट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर एस झा आणि निर्मिती भरत शाहने केली आहे.ही एक रुपक कथा असून या चित्रपटाची शूटिंग गोवामध्ये करण्यात आली आहे. यामध्ये नाना पाटेकर आणि माही गिलची मुख्य भूमिका आहे. चित्रपटात नाना पाटेकर यांनी नागार्जुन तर माहि गिलने कहानी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. या दोघांव्यतिरीक्त चित्रपटात प्रियांशु चटर्जी, श्रुती मराठे, यतीन कार्येकर, कानिका डग यांच्याही भूमिका आहेत.

कहानी आणि निर्भय, मुंबईत राहत असतात. एक वर्षापूर्वी त्या दोघांची भेट गोवा येथे झालेली असते. एकमेकांसाठी बनलेल्या या दोघांची अगदी कमी वेळात चांगलीच मैत्री होते. दोघांच्या जीवनात नैतिकता व प्रिसिंपल आहेत. ते प्रेमात पडतात आणि दोघे लग्न करतात. गोव्यात ज्या ठिकाणी ते पहिल्यांदा भेटलेले असतात तेथेच ते लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतात. कहानी, गोव्यात सकाळी पोहचणार असते आणि निर्भय सायंकाळी पोहचणार असतो. कहानी वेळेत ठरलेल्या ठिकाणी पोहचते आणि रात्रीसाठी विशेष तयारी करण्यासाठी व्यस्त होते. ती आधी स्पामध्ये जाते आणि त्यानंतर आवश्यक वस्तुंची खरेदी करते.

या एका दिवसामध्ये तिला काही आठवणीतील लोक भेटतात. जी तिच्या मनावर आणि हृदयावर एक छाप सोडतात. ती घरी येते आणि तयारी करण्यात मग्न होते. तिला वाटते की या विशेष संध्याकाळी आपल्या नव-यासाठी एखाद्या परिसारखा पोशाक परिधान करावा. सुंदरपणे तयार झालेली कहानी तिच्या नव-याची वाट पाहत असते. तिला तिच्या नवरा निर्भय फोन करतो आणि सांगतो की मी काही व्यावसायिक कारणामुळे विमान पकडू शकत नाही. यामुळे कहानी उदास, चिंतीत होते.

शेखर एस झा एक भारतीय दिग्दर्शक आहे, जो हिंदी सिनेमात अप्रतिम कामासाठी ओळखला जातो. त्याने काही नाटके आणि लघु चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. ‘एक दस्तक’ हात त्याचा पहिला चित्रपट आहे. त्याचा दुसरा चित्रपट ‘प्रेम माई’ चे हा २०१२मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘वेडिंग एनिवर्सरी’ हा त्यानेच दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे.