03 March 2021

News Flash

आयफोनच्या विनोदात नानांचा बाणा….व्हायरल

आयफोन ७ ची चर्चा करणाऱ्यांवर नाना कसे भडकले असते.

अ‍ॅप्पलने नुकताच ‘आयफोन ७’ हा आपला नवा स्मार्टफोन बाजारात आणला. स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल होण्यास अद्याप उशीर असला तरी या अॅपलच्या नव्या स्मार्टफोन बद्दल भारतीयांमध्ये अधिक उत्सुकता दिसली होती. ट्विटर आणि फेसबुकवर अॅपलच्या नव्या स्मार्टफोनच्या चर्चेला उधाण आल्याचे दिसले होते. सामान्य माणसाला हा फोन वापरणे शक्य नसले तरी त्यांच्यात देखील स्मार्टफोन विषयी उत्सुकता दिसली होती. परदेशात लाँच करण्यात आलेल्या उत्पादनाबाबत भारतीयांमध्ये रंगलेल्या चर्चेवर काही विनोदही  सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये आता नानांच्या व्हिडिओचा समावेश झाला आहे.

बॉलीवूड आणि मराठी चित्रपटामध्ये आपल्या भारदस्त आवाजाने लोकप्रिय असणाऱ्या नानांच्या आवाजात आयफोन ७ वर करण्यात आलेला विनोद सोशल मिडियामध्ये व्हायरल होताना दिसत आहे. नाना पाटेकर यांच्या ‘अग्निसाक्षी’ या चित्रपटातील डायलॉगच्या साहय्याने आयफोनचा आनंद साजरा करणाऱ्यावर नाना कसे भडकले असते. हे या व्हिडिओतून दिसून येते. ‘अ ट्रू इंडियन’ नावाच्या फेसबुक पेजवरील नानांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

अॅपलच्या फोनची क्रेझ अनेकांवर आहे. त्यामुळे आयफोन सिरिजमध्ये आणखी नवा फोन येणार म्हटल्यावर अॅपल प्रेमी जवळपास वेडेच झाले होते. आपल्या दहावी, बारावीच्या रिझल्टची देखील इतक्या आतुरतेने वाट पाहिली नसेल इतकी वाट आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लसची अनेकांनी पाहिली. अखेर नवा आयफोन कसा असणार याचे आपल्या दृष्टीने असलेले रहस्य एकदाचे उलगडले. पण या फोनचे फिचर्स जाणून घेतल्यावर अवघ्या काही मिनिटांत खरी मज्जा सुरू झाली.
आयफोनची किंमत ही जवळपास ६० हजारांपासून सुरू आहे. त्यामुळे या आकड्यामुळे बिचा-या अॅपलप्रेमींच्या आनंदावर विरजण घातले गेले. हा फोन लाँच होऊन २४ तासही उलटले नसतील तर जगभरातील नेटीझन्सने आपापली विनोदबुद्धी वापरून या किंमतीवर विनोद करण्याचा जणू  चंगच बांधला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2016 10:52 pm

Web Title: nana patekar reaction on iphone 7 video viral
Next Stories
1 शेवटी अक्षय कुमारने अंगावर कोरले ‘तिचे’ नाव
2 एका क्षणात बदलला धोनीचा चेहरा
3 बहुचर्चित ‘पार्श’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
Just Now!
X