News Flash

साजिदनंतर नाना पाटेकरही ‘हाऊसफुल ४’ मधून बाहेर?

नाना पाटेकर यांच्यावरदेखील लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप आहेत त्यामुळे या चित्रपटातून त्यांना वगळण्याचा विचार सुरू आहे.

'हाऊसफुल ४' च्या दिग्दर्शक पदावरून पायउतार झाल्यानंतर दिग्दर्शन फरहाद सामजी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.

अभिनेता नाना पाटेकर नंतर दिग्दर्शक साजिद खानवरही लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप झाले. गेल्या आठवड्यात पत्रकार आणि सहाय्यक दिग्दर्शिकेनं केलेल्या आरोपानंतर सादिज खान चांगलाच अडचणीत सापडला आहे. साजिद खानवरचे आरोप हे अत्यंत धक्कादायकच होते. नाना आणि साजिदवर असलेल्या आरोपांमुळे सध्या ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्णपणे थांबवण्यात आलं आहे. साजिदनं नैतिक जबाबदारी स्वीकारत ‘हाऊसफुल ४’ चं दिग्दर्शन न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे नाना पाटेकर यांनाही ‘हाऊसफुल ४’ मधून वगळण्याचा विचार सुरू असल्याचं समजत आहे.

अक्षय कुमारनं गेल्या आठवड्यात ट्विट करत लैंगिक गैरवर्तणुकीसारखे गंभीर आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीसोबत आपण काम करणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता ‘हाऊसफुल ४’ मध्ये नानाऐवजी अनिल कपूर किंवा संजय दत्त या दोन नावांचा विचार होत असल्याचं ‘पिंक व्हिला’नं म्हटलं आहे. साजिदनंतर नाना पाटेकर या चित्रपटातून बाहेर पडले तर निर्मात्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्वीच नानांसोबत इतर कलाकारांचे चित्रीकरण पार पडलं आहे. त्यामुळे निर्माते आता पेचात सापडले आहेत. २००८ साली नाना पाटेकर यांनी ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटादरम्यान आपल्याशी असभ्य वर्तणूक केली असा आरोप तनुश्री दत्तानं नुकताच केला होता. तसेच नाना पाटेकरसारख्या अभिनेत्यासोबत काम न करण्याचं आवाहन तिनं बड्या कलाकरांना केलं होतं.

पण, तुर्त तरी संजय आणि अनिल कपूर या दोघांची नावं ‘हाऊसफुल ४’ साठी चर्चेत आहेत. ‘हाऊसफुल ४’ च्या दिग्दर्शक पदावरून पायउतार झाल्यानंतर दिग्दर्शन फरहाद सामजी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 11:08 am

Web Title: nana patekar to be replaced in housefull 4 after sexual harassment allegations made by tanushree dutta
Next Stories
1 Video : अशी आहे ‘कसौटी जिंदगी..’च्या कोमोलिकाची पहिली झलक
2 Bigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे बाहेर
3 #MeToo : वडीलांवर झालेल्या आरोपाविषयी मल्लिका दुआ म्हणते…
Just Now!
X