17 February 2019

News Flash

…म्हणून दिव्या दत्ताविरोधात तक्रार दाखल

दिव्या दत्ताबरोबर जावेद सिद्धीकी आणि अमरीक दिल यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

दिव्या दत्ता

बॉलिवूडचे दिवंगत अभिनेता ओमपुरी यांचं निधन होऊन बराच काळ लोटला आहे. मात्र आजही चित्रपट,नाटक यांच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाळा मिळत असतो. ओमपुरी यांचे जसे चित्रपट गाजले त्याप्रमाणेच त्यांनी अभिनय केलेली नाटकेही चाहत्यांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या याच नाटकांपैकी ‘तेरी अमृता’ या नाटकावरुन नवा वाद निर्माण झाला असून ओमपुरी यांच्या पत्नीने अभिनेत्री दिव्या दत्ताविरोधात तक्रार दाखल केली आहे.

‘स्पॉटबॉय’नुसार, ‘तेरी अमृता’ या पंजाबी नाटकामध्ये दिव्या दत्ताने दिवंगत अभिनेता ओमपुरी यांच्याबरोबर काम केलं होतं. त्यामुळ हे नाटक पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा प्रयत्न दिव्या दत्ताने सुरु केला. विशेष म्हणजे दिव्याला नाटकाचे कॉपीराईट्स मिळाले नसतानाही तिने या नाटकाचं ९ सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये प्रिमिअर आयोजित केलं होतं. याच कारणास्तव नंदिता यांनी दिव्या दत्ताबरोबर जावेद सिद्धीकी आणि अमरीक दिल यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

‘तेरी अमृता’ या नाटकाचे अधिकार ओमपुरी यांच्या कंपनीकडे आहेत. त्यामुळे या नाटकाचे कॉपीराईट्स मिळावे यासाठी दिव्याने नंदिता यांची भेट घेतली होती. मात्र काही कारणास्तव दिव्याला या नाटकाचे अधिकार मिळू शकले नाहीत. या कारणास्तव दिव्या आणि गुरुदास मान यांनी कंपनीच्या परवानगीशिवाय हे नाटक पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या संबंधीत प्रकारावर आक्षेप घेत नंदिता यांनी कायदेशीर कारवाई करण्याचं निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे.

First Published on September 1, 2018 2:55 pm

Web Title: nandita filed complaint against divya dutta related to play