25 November 2020

News Flash

ड्रग्ज प्रकरणात भारती सिंहचं नाव आलं समोर; NCBने बजावले समन्स

कॉमेडियन भारती सिंहच्या घरी NCBची धाड

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली होती. या यादीत आता प्रसिद्धी कॉमेडियन भारती सिंह हिचं देखील नाव समोर आलं आहे. एनसीबीने भारती आणि तिचा पती हर्ष यांना समन्स बजावलं आहे.

शनिवारी ( २१ नोव्हेंबर) सकाळी एनसीबीच्या पथकानं प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी धाड टाकली. यावेळी करण्यात आलेल्या झाडाझडतीत अधिकाऱ्यांना भारतीच्या घरातून गांजा मिळाला. एनसीबीच्या मुंबईतील झोनल पथकाने ही कारवाई केली आहे. ड्रग पेडलरने दिलेल्या माहितीनंतर एनसीबीने ही कारवाई केली. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी भारती विरोधात समन्स जारी केलं आहे.

भारती सिंह ही एक प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री आहे. २००८ साली ‘द ग्रेड इंडियन कॉमेडी शो’ या स्पर्धेतून भारतीने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी सर्कस के सुपरस्टार’, ‘कॉमेडी सर्कस का जादू’ यांसारख्या अनेक स्टँडअप कॉमेडी शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. याशिवाय ती ‘एफ. आय. आर.’, ‘बिग बॉस’, ‘अदालत’, ‘खिलाडी 786’, ‘सनम रे’ यांसारख्या अनेक मालिका आणि चित्रपटांमध्येही झळकली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 1:44 pm

Web Title: narcotics control bureau summons comedian bharti singh mppg 94
Next Stories
1 Bigg Boss: कॅप्टन होण्यासाठी काहीही; काम्या-संग्राम ४१ तास बंद होते लहानशा खोक्यात
2 कपिलच्या घरी होणार नव्या पाहुण्याचं आगमन?
3 तैमुर देखील अभिनेता होणार का?; जॅकलिनच्या प्रश्नावर सैफ अली खान म्हणाला…
Just Now!
X