19 September 2020

News Flash

मोदींनी ‘मन बैरागी’ पाहाण्यास दिला नकार, कारण वाचून बसेल धक्का

समाजाला प्रेरणा देण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.

‘मन बैरागी’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता आहे. हा चित्रपट बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय त्रिपाठी दिग्दर्शीत करणार आहेत. परंतु नरेंद्र मोदी मात्र ‘मन बैरागी’ पाहण्यास इच्छूक नाहीत.

नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसादिवशीच ‘मन बैरागी’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला. महावीर जैन हे या चित्रपटाचे सहनिर्माता आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने घेतल्या गेलेल्या एका मुलाखतीत “मोदी हा चित्रपट पाहाणार नाही” असे त्यांनी म्हटले.

“नरेंद्र मोदी यांच्याकडे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. रस्त्यावरील एक सामान्य चाहावाला ते भारताचे पंतप्रधान हा त्यांचा प्रवास थक्क करणारा व प्रेरणादायी आहे. म्हणूनच आम्ही त्यांच्या आयुष्यातील विविध पैलू समाजासमोर सादर करण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरवले. हा चित्रपट कोणत्याही प्रकारच्या व्यवसायिक नफ्यासाठी तयार केला जाणार नाही. परंतु नरेंद्र मोदी हा चित्रपट पाहाणार नाहीत. खरं तर त्यांना त्यांची स्तुती केलेले कुठलेही साहित्य वाचायला, पाहायला किंवा ऐकायला आवडत नाही, त्यामुळे त्यांनी हा चित्रपट पाहाण्यास साफ नकार दिला.” असे चित्रपटाचे सहनिर्माता महावीर जैन यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 12:46 pm

Web Title: narendra modi man bairagi sanjay leela bhansali mahaveer jain mppg 94
Next Stories
1 महेश मांजरेकरांच्या मुलीवर मराठी कलाकारही फिदा, वाचा हे कमेंट्स
2 अली जफरने केला छळ; पाकिस्तानी गायिकेने मानहानीपोटी मागितले दोन अब्ज रूपये
3 Video : ‘इंडियन २’मुळे कमल हासन पोहोचले कारागृहात
Just Now!
X