News Flash

प्रेमात धोका,पैशासाठी कुटुंबाने केला वापर; दुःखाने भरलेलं सदाबहार अभिनेत्री नर्गिसचं आयुष्य

दागिने विकून राज कपूर यांच्यावरील कर्ज फेडलं

हिंदी फिल्म इंडस्ट्रीत महान अभिनेत्रींच्या यादीमध्ये सदाबहार अभिनेत्री नर्गिस यांचं देखील नाव घेतलं जातं. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरुपी छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे नर्गिस होय. नर्गिस यांनी आपले सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर मनं जिंकली होती. १ जून १९२९ रोजी त्यांचा जन्म कोलकत्तामध्ये झाला. नर्गिस आपल्या सिनेमांबरोबरच खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या. आज नर्गिस यांची ९२ वी जयंती आहे. त्यांच्या आजच्या जयंती दिनानिमित्ताने त्यांच्या आयुष्यातील खास गोष्टी जाणून घेऊयात.

नर्गिसनं दागिने विकून राज कपूर यांच्यावरील कर्ज फेडलं
फिल्म इंडस्ट्रीत जिथे प्रेमाचा उल्लेख होतो तिथे राज कपूर आणि नर्गिस दत्त यांच्या लवस्टोरीचा उल्लेख आवर्जुन केला जातो. नर्गिस आणि राज कपूर यांची भेट ही हुबेहूब फिल्मी अंदाजने झाली होती. राज कपूर एका चित्रपटासंदर्भात नर्गिस यांच्या आईला भेटण्यासाठी गेले होते. नर्गिसच्या आई जद्दनबाई घरी नव्हत्या. नर्गिस त्यावेळी घरात गरमा गरम भजे तळत होत्या ज्यावेळी नर्गिस यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी त्यांच्या हाताला बेसनपीठ लागलं होतं. त्यांच्या गालावरही ते बेसनपीठ लागलं होतं. नर्गिस यांच्या भोळेपणावर राज कपूर फिदा झाले होते. पहिल्या भेटीचा हा अस्सल किस्सा राज कपूर यांनी त्यांच्या ‘बॉबी’ चित्रपटात तशाच्या तसा उतरवला होता.

raj-kapoor-krishna-nargis-1200

‘आवारा’ चित्रपटाच्या एका गाण्याची शूटिंग करण्यासाठी राज कपूर यांनी ८ लाखांचं कर्ज घेतलं होतं. त्यानंतर हा चित्रपट आणखी ओव्हरबजेट होऊन सगळा शूटिंगचा खर्च १२ लाखांपर्यंत गेला होता. त्यावेळी राज कपूर यांच्या अडचणीत नर्गिस यांनी आपले दागिने विकून राज कपूर यांच्यावरील सगळं कर्ज फेडलं. राज कपूर यांचा ‘प्यार ही था’ चित्रपट सुपरहिट व्हावा यासाठी नर्गिस यांनी त्या काळात बिकनी घातली होती. तो चित्रपट रूस, चीन आणि अफ्रीकी देशांमध्ये खूप चालला. पण दोघांचं नातं खूप काळ चालू शकलं नाही आणि काही दिवसानंतर नर्गिस यांनी राज कपूर यांच्याशी दुरावा ठेवताना दिसून आली. त्यानंतर नर्गिस यांनी सुनिल दत्त यांच्यासोबत लग्न केलं आणि फिल्म इंडस्ट्रीला रामराम केला.

ब्लेडनं हात कापून केला होता आत्महत्येचा प्रयत्न
स्वतःच्या लग्नाच्या आधी नर्गिस यांनी आपल्या भावाचा संसार सुरळीत होण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्यानंतर भावानं नर्गिस यांच्याकडे दुर्लक्ष केलं. नर्गिस आपलं दुःख सुनील दत्त यांना सांगत असतं. पण सुनील दत्त यांच्याकडून त्यांना कोणतचं उत्तर मिळत नव्हतं. आधीच राज कपूर यांच्यासोबत नातं तुटल्यानं नर्गिस दुखावल्या होत्या. त्यात सुनिल दत्त सुद्धा त्यांना टाळत आहेत, असं त्यांना वाटलं आणि यात त्यांनी अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एकदा तर त्यांनी ब्लेडने हात कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण यातून त्या वाचल्या आणि मग सुनील दत्त आणि नर्गिस यांचं लग्न झालं. सुनिल दत्त यांच्या सोबत लग्न केल्यानंतर मात्र नर्गिस यांचं आयुष्य बदललं.

nargis

अडचणीच्या काळात सुनिल दत्त बनले नर्गिसचा आधार
‘मदर इंडिया’ चित्रपटात नर्गिस यांच्या मुलाच्या भूमिकेसाठी सुनील यांची निवड केली होती. चित्रपटाच्या सेटवर एक घटना घडली ज्यामुळे दोघेही एकत्र आले. गुजरात येथील बिलीमोर गावात ‘मदर इंडिया’ची शूटिंग सुरू होती. चित्रपटाच्या एका दृश्यात शेतात आग लागते. परंतु या आगीत नर्गिस या खरंच अडकल्या होत्या आणि सुनील यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवले होते. खरंतर यादरम्यान सुनील देखील खूप भाजले होते. नर्गिस यांनी त्यांची रुग्णालयात खूप काळजी घेतली होती. आगीच्या घटनेनंतर नर्गिस यांचा सुनील यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले होते.

Nargis Sunil

कुटुंबाने पैशासाठी केला वापर
राज कपूर आपल्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना लांब करणार नाही, हे नऊ वर्षाच्या रिलेशनशिपनंतर नर्गिस यांच्या लक्षात आलं होतं. तर दुसरीकडे नर्गिसच्या कुटुंबाने त्यांना फक्त ‘पैसे बनवणारी मशीन’ म्हणून समजलं होतं. त्यांच्या आयुष्यात सुनिल हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी त्यांना एका सामान्य माणसाप्रमाणे वागणूक दिली.

नर्गिस यांनी त्यांच्या डायरीत लिहिलं होतं, “त्यांचे खांदे नेहमी मला रडताना आधार देतात, मला हे माहितेय की त्यांचे कपडे नेहमी माझ्या अश्रुंना सोकून घेतील आणि माझ्या डोळ्यातून ते अश्रु बाहेर पडू देणार नाहीत, कारण त्या अश्रुंची जग मस्करी करेल.”

स्वतःसाठी खूप वाईट भावना मनात येत होत्या
नर्गिस यांनी सुनिल दत्त यांच्यासमोर राज कपूर यांच्यासोबतच्या नात्याबाबत कबुली दिली होती. त्यांनी सांगितलं होतं, राज कपूर यांनी त्यांच्या मनात स्वतःसाठी खूप वाईट भावना निर्माण केल्या होत्या. सुनिल दत्त यांच्या आयुष्यात येण्याआधी त्यांच्याकडे जगण्याचं काहीच कारण नव्हतं, असं देखील त्यांनी सांगितलं होतं.
‘मदर इंडिया’ चित्रपटाने नर्गिस यांना रातोरात स्टार बनवलं होतं. या चित्रपटासाठी त्यांना ५० हजार रूपये मिळाले होते. तर सुनिल दत्त यांना केवळ १० ते १२ हजार रूपये मिळाले होते.

जेव्हा नर्गिसबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना जीवे मारण्याची धमक्या मिळू लागल्या होत्या. याचे कारण कदाचित नर्गिस मुस्लीम कुटुंबातील असणे हे असावे. या दोघांचे लग्न फार काळ टिकणार नाही, असेही त्याकाळी बोलले गेले होते. मात्र सुदैवाने तसे काही घडले नाही. घेही आपल्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी होते. त्यांच्या संसारवेलीवर तीन फुलंही उमलली. मात्र कॅन्सरमुळे नर्गिस आणि सुनील दत्तची यांची साथ सुटली. 3 मे 1981 रोजी नर्गिस यांचे मुंबईत निधन झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 1:12 pm

Web Title: nargis birth anniversary know love story with sunil dutt after long relationship with raj kapoor prp 93
Next Stories
1 ”माझं शरीर..माझी अब्रू..माझी मर्जी”, ओढणी का घेत नाहीस विचारणाऱ्या युजरला दिव्यांका त्रिपाठीची चपराक
2 Video: २० वर्षींनी गोविंदा आणि नीलम आले एकत्र; ‘आप के आ जाने से’ गाण्यावर केला डान्स
3 ‘टप्पू’ आणि ‘जेठालाल’मध्ये झाले भांडण? राज अनादकतनी केला खुलासा
Just Now!
X