‘रॉकस्टार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आलेली नर्सिग फाक्री आता झगमगत्या दुनियेपासून खूपच लांब गेली आहे. प्रकृती अस्वास्थामुळे नर्गिसनं काही काळापुरता बॉलिवूडमध्ये काम करणं बंद केलं होतं. नर्गिसनं आता तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात तिनं वाढत्या वजनामुळे सहन कराव्या लागलेल्या टीकेबद्दल आपल्या भावना वक्त केल्या आहेत.
उंच शिडशिडत बांध्याची नर्गिस अभिनेत्रीबरोबर यशस्वी मॉडेल म्हणूनही ओळखली जाते. मात्र आता वाढत्या वजनामुळे लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असल्याचं तिनं म्हटलं आहे. ‘कलाकार म्हणून नेहमीच प्रसिद्धी मिळते पण या प्रसिद्धीमुळे कधीकधी जगणं असह्यही होतं. गेल्या दोन वर्षांत माझं वजन वाढलं आहे’, असं म्हणत नर्गिसनं पूर्वीचा आणि आत्ताचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘तुमचं मन, शरीर आणि आत्मा नेहमीच सकारात्मक विचारांनी प्रसन्न ठेवा . जर मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता’ असं नर्गिस या पोस्टमध्ये म्हणाली आहे. वाढत्या वजनांमुळे अनेकदा बॉडी शेमिंगचा सामना करावा लागतो मात्र लोकांच्या टीकांमुळे मी निरोगी आयुष्य जगणं सोडणार नाही असंही तिनं एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.
गेल्या वर्षभराच्या प्रवासात वाढतं वजन आणि तिचा प्रवास याबद्दल अनेक गोष्टी येणाऱ्या काळात ती सोशल मीडियावर उलगडत जाणार आहे. काही महिन्यांपूर्वी वाढलेल्या वजनामुळे ती गर्भवती असल्याच्या चर्चांनाही उढाण आलं होतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 1, 2019 12:18 pm