News Flash

राजकुमार- नर्गिसचा ‘५ वेडिंग्ज’ प्रेक्षकांच्या भेटीला

२६ ऑक्टोबरला संपूर्ण देशात हिंदी आणि इंग्रजीत हा चित्रपट प्रदर्शित होईल.

राजकुमार राव, नर्गिस फाक्री

‘न्यूटन’, ‘स्त्री’ अशा एकाहून एक दमदार चित्रपटात भूमिका साकारणारा अभिनेता राजकुमार आगामी ‘५ वेडिंग्ज’ चित्रपटात नर्गिस फाक्रीसोबत झळकणार आहे. या चित्रपटात एका अमेरिकन पत्रकाराची गोष्ट आहे. जी बातमीचा पाठपुरावा करताना संशोधनासाठी भारतात येते. तिला त्यात ५ लग्नाचे रिपोर्टिंग करायचे असते. त्या दरम्यान भिन्न, वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक संघर्षात आणि तिच्या यापूर्वी हरवलेल्या प्रेमात ती कशी अडकत जाते हे यात पाहायला मिळतं.

या चित्रपटात राजकुमार आणि नर्गिस यांची रोमॅण्टिक केमिस्ट्री पाहायला मिळेल, असं दिग्दर्शिका नम्रता सिंह गुजराल म्हणाल्या. सध्या लोकप्रियतेच्या लाटेवर असलेला राजकुमार या चित्रपटात खाकी वर्दीतला पोलीस साकारणार असून त्याच्या चाहत्यांसाठी ही वेगळी भूमिका संस्मरणीय ठरेल असा त्याला विश्वास आहे.

वाचा : ‘मिर्झापूर’ वेब सीरिजमध्ये श्रिया पिळगांवकर महत्त्वपूर्ण भूमिकेत 

विशेष म्हणजे या चित्रपटाचा प्रीमियर कान्समध्ये झाला, तर मेलबर्न चित्रपट महोत्सवात त्याचे प्रचंड कौतुक झाले. चित्रीकरणादरम्यान सेटवर राजकुमार आणि नर्गिस इतके धमाल करायचे कि त्यातून एक मस्त वातावरण तयार झाले आणि त्यामुळे एकंदर हा चित्रपटही खूप चांगला जमून आला आहे. चित्रपटातल्या एका गाण्यात तर या दोघांची केमिस्ट्री इतकी छान जुळून आली आहे कि त्यांच्या चाहत्यांसाठी हे गाणे म्हणजे पर्वणी असेल, असंही दिग्दर्शिका म्हणाल्या.

या चित्रपटाला मीडिया इंटरनेशनल सादर करत असून येत्या २६ ऑक्टोबरला संपूर्ण देशात हिंदी आणि इंग्रजीत हा चित्रपट प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 8:06 pm

Web Title: nargis fakhri rajkummar rao upcoming movie 5 weddings
Next Stories
1 मलायका-अर्जुन करणार लवकरच नात्याची अधिकृत घोषणा?
2 ‘मिर्झापूर’ वेब सीरिजमध्ये श्रिया पिळगांवकर महत्त्वपूर्ण भूमिकेत
3 अडचणी दूर, ‘सेक्रेड गेम्स २’ होणारच!
Just Now!
X