27 February 2021

News Flash

नर्गिसच्या आयुष्यात नव्या नायकाची एंट्री?

उदय चर्चेत आला नसला तरी त्याची पूर्वी प्रेयसी नर्गिस मात्र सध्या चर्चेत आली आहे.

नर्गिस फाख्री

बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाख्री आणि अभिनेता उदय चोपडा यांचे नाते संपुष्टात आल्यानंतर दोघांनीही आपल्या वेगळ्या वाटा निवडल्या. त्यानंतर उदय चोपडा हे नावही बॉलिवू़डमध्ये फार काळ आपले स्थान निर्माण करु शकले नाही. उदय चर्चेत आला नसला तरी त्याची पूर्वी प्रेयसी नर्गिस मात्र सध्या चर्चेत आली आहे.

उदय चोपडापासून फारकत घेतल्यानंतर नर्गिस पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे दिसून येत आहे. मात्र यावेळी पार्टनर म्हणून तिने बॉलिवूडच्यानाही तर हॉलिवूडच्या एका व्यक्तीची निवड केल्याचे दिसून येते. हॉलिवूडमधील संगीत दिग्दर्शक आणि निर्माता मॅट आलोंजो याला नर्गिस डेट करत असल्याचे वृत्त समोर येत आहे. नर्गिसने मॅटसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत अधिकृतरित्या त्यांच्यातील नाते सर्वांसमोर मान्य केले आहे.

नर्गिसने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन मॅटबरोबरचा एक फोटा शेअर केला आहे. यात तिच्या हातावर ‘एम’ आणि ‘एन’ असे एक टॅटूही काढले आहे. या ‘एम’ आणि ‘एन’ चा अर्थ ‘मॅट’ आणि ‘नर्गिस’ असल्याचे सांगण्यात येत आहे.
२०१७ साली नर्गिस आणि मॅट यांची भेट झाल्यानंतर त्यांनी काही काळ एकमेकांना डेट केले. यानंतर ते लॉस एंजेलिसमध्ये लिव इन रिलेशन मध्ये राहत असल्याचे वृत्त ‘मुंबई मिरर’ने प्रसिद्ध केले आहे.

वाचा : ‘१०२ नॉट आऊट’च्या स्क्रिनिंगसाठी ‘या’ खास व्यक्तीची हजेरी

टॅटू काढण्यापूर्वी नर्गिस प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होती. मात्र मॅकने समजूत घातल्यानंतर ती तयार झाली. एवढेच नाही तर टॅटू काढल्यानंत नर्गिसच्या चेह-यावर विशेष आनंद होता. नात्यातील बंध आणखी घट्ट झाल्याचे समाधान तिच्या चेह-यावर स्पष्ट दिसत असल्याचे नर्गिसशी संबंधित एका सूत्राने सांगितले. नर्गिस आणि मॅट सध्या एका म्युझिक व्हिडिओवर काम करत आहेत.
नर्गीसने २०११ मध्ये इम्तियाज अली दिग्दर्शित ‘रॉकस्टार’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटाने तिला नाव मिळाले मात्र त्यापुढे चित्रपटांमध्ये ती आपला ठसा उमटवू शकली नाही. या दरम्यान ती आपल्या चित्रपटांपेक्षा उदय चोपडाबरोबरच्या नात्यामुळे अधिक चर्चेत राहिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2018 12:19 pm

Web Title: nargis fakhri relationship hollywood director
Next Stories
1 PHOTO : अनुष्का, फक्त तुझ्यासाठी…
2 मी माझ्या पत्नीची साथ देणारच, ‘त्या’ वादांनंतर अक्षयने केली ट्विंकलची पाठराखण
3 ‘१०२ नॉट आऊट’च्या स्क्रिनिंगसाठी ‘या’ खास व्यक्तीची हजेरी
Just Now!
X