05 March 2021

News Flash

Video : ‘इसबार भी वो अंधेरा छाएगा’, थरकाप उडवणारा ‘अमावस’चा टीझर

११ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'अमावस' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

‘रागिनी एमएमएस २’, ‘अलोन’ आणि ‘१९२० एविल रिटर्न्स’ यांसारख्या भयपटांचे दिग्दर्शक भूषण पटेल आणखी एक भटपय प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ‘अमावस’ असं या चित्रपटाचं नाव असून हॅलोविनला त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता या भयपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये नरगिस फाख्री, सचिन जोशी, विवान भटेना, नवनीत कौर ढिल्लन, मोना सिंग आणि अली असगर यांच्या भूमिका आहेत.

‘इसबार भी वो अंधेरा छाएगा अपनी पुरी ताकदों के साथ,’ असे काही संवाद या टीझरमध्ये आहेत. अमावस्येच्या रात्रीची ही कथा आहे आणि हा टीझर तुमच्याही काळजाचा ठोका चुकवेल. या भयपटाची संपूर्ण शूटिंग लंडनमध्ये ४० दिवसांत झाली. ११ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रहस्यमय, गूढ, थरारपट, भयपट म्हटले की ज्या अपेक्षा प्रेक्षक करतो त्या नेहमीच पूर्ण होतात असे नाही. ‘रागिनी एमएमएस २’, ‘अलोन’ हे चित्रपट बॉक्स ऑफीसवर जेमतेम चालले. त्या तुलनेत ‘अमावस’ बॉक्स ऑफीसवर हिट ठरेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 12:50 pm

Web Title: nargis fakhri starrer horror movie amavas teaser released
Next Stories
1 ..म्हणून आमिरचा अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिकला नकार
2 साजिदच्या अश्लील वागणुकीची लारानं दिली होती कल्पना, महेश भूपतीचा खुलासा
3 आयुषमानच्या ‘बधाई हो’ने मोडला ‘बाहुबली २’चा हा विक्रम
Just Now!
X