रॅम्पवर चालताना डिझायनर कपड्यांसोबत अघटित घडणे ही काही नवी बाब नाही. कोणाचा ड्रेस घसरतो तर कोणाचा फाटतो. असेच काहीसे घडले ते बॉलीवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीसोबत. ड्रेस फाटण्याच्या प्रकाराने नर्गिस फाखरीला लाजीरवाण्या घटनेला सामोरे जावे लागले आहे.

दिल्लीमध्ये सुरु असलेल्या इंडियन ब्रायडल फॅशन वीक २०१४मध्ये मॉडेल आणि अभिनेत्री नर्गिस फाखरीने रॅम्पवॉक केला. यावेळी तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. मात्र रॅम्पवर चालताना अचानक तिचा ड्रेस मध्यभागी फाटला. त्याचवेळी तिने हसत ड्रेस आवरला आणि सदर लाजिरवानी घटना सांभाळली. याविषयी सांगताना नर्गिस म्हणाली, ‘कुणीतरी माझ्या ड्रेसवर पाय ठेवल्याने असे घडले. मला यावर हसू आले आणि ते मी रोखू शकले नाही. मी घाबरले होते. मी जेव्हा घाबरते तेव्हा मला हसू येते.’
अमेरिकेत जन्मलेल्या नर्गिसने २०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘रॉकस्टार’ चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.