20 March 2019

News Flash

फ्लॅशबॅक : नसिरचे काही दुर्मिळ चित्रपट…

नसिरच्या या समांतर व कमर्शियल अशा दोन्ही वाटचालीतील महत्त्वपूर्ण चित्रपट ठरला, राजीव राॅय दिग्दर्शित 'त्रिदेव'.

एकदा अभिनयाचा व्यवसाय करायचं ठरवल्यावर चित्रपट निवडताना अथवा स्वीकारताना काही तडजोड करावी लागतेच हे त्या काळात नसिरने स्वीकारलेय.

dilip thakurदिलीप ठाकूर
मजकूरासोबतचे छायाचित्र पाहताक्षणीच अनेकांना प्रश्न पडला असेल की, शिल्पा शिरोडकरसोबतचा नसीरुद्दीन शाहचा हा चित्रपट कोणता बरे? आठवत कसा नाही ? पण खरंच आपण हा चित्रपट पाहिलाय? समांतर अथवा कलात्मक चित्रपटाकडून नसिर मसालेदार मनोरंजक चित्रपटाकडे वळला, तेव्हा तो चित्रपट होता, ‘तजुर्बा ‘. त्यात स्मिता पाटीलही त्याच्यासोबत असल्याने त्याला व्यावसायिक चित्रपटाच्या सेटवर परकेपण नक्कीच जाणवले नसणार. नसिरच्या या समांतर व कमर्शियल अशा दोन्ही वाटचालीतील महत्त्वपूर्ण चित्रपट ठरला, राजीव राॅय दिग्दर्शित ‘त्रिदेव’. पण त्यात त्याची नायिका म्हणून सोनमची निवड होताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. ही जोडी पडद्यावर कशी बरे शोभेल या प्रश्नाला हे दोघेही ‘ओये ओये…. तिरछी टोपीवाले’ गाण्यावर झक्कास नाचल्यावर उत्तर मिळाले. नसिरचे असे ग्लॅमरस तारकांसोबतचे काही चित्रपट सांगायचे तर, चोर पे मोर (सोनम), लक्ष्मण रेषा (शिल्पा शिरोडकर), हस्ती (वर्षा उसगावकर), जुल्म को जला दूंगा (वसंतसेना)…. याचप्रमाणे ‘दंडनायक'(१९९८)

एकदा अभिनयाचा व्यवसाय करायचं ठरवल्यावर चित्रपट निवडताना अथवा स्वीकारताना काही तडजोड करावी लागतेच हे त्या काळात नसिरने स्वीकारलेय. याचे एक महत्त्वपूर्ण कारण अशा चित्रपटातून चांगले पैसे मिळतात हेदेखील असतेच. (कालांतराने आपल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्याने यावर भाष्य केलेच.) या सार्‍याला ‘दुसरी बाजू ‘ही आहेच. या ग्लॅमरस प्रतिमा असणार्‍या अभिनेत्रीना बुध्दिवादी नसिरसोबत काम करण्याची तसेच नृत्याचीही आणि महत्वाचे म्हणजेच या चित्रपटांच्या आऊटडोअर्सना गप्पांची छान संधीही मिळालीय. ‘शिकारी ‘च्या रशियातील शूटिंगवरुन आल्यावर नसिरच्या व्यक्तिमत्त्वाने वर्षा प्रचंड इम्प्रेस झाल्याचे तिच्याशी गप्पा करताना जाणवे. एक प्रकारे हे नसिरच्या सहवासातून अप्रत्यक्ष लाभलेले जणू टाॅनिकच. आणि शिल्पालाही नसिरसोबत काम केल्याने आपल्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचे जाणवले. नसिरच्या मसालेदार चित्रपटांची त्याच्या चाहत्यांना कदाचित माहिती नसेलही. त्यानेही कलात्मक चित्रपटातून भूमिका केल्याने पैसे मिळत नसत. पण सेटवर जेवण्याची व्यवस्था व्हायची हे आठवणीत ठेवले असेल व या व्यक्तिरेखांनाही पुरस्कार दिल्याचा आनंदही मानला असेल. पण त्याच वेळेस या अभिनेत्रीही त्याच्यासोबत भूमिका केल्याने सुखावल्यात. ( बरोबरच्या फोटोत ते प्रकर्षाने दिसतेय ना? )

First Published on May 18, 2018 12:05 am

Web Title: naseeruddin shah rare movies flashback by dilip thakur