१९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘आज का अर्जुन’ या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शक के.सी.बोकाडिया यांनी एकत्र काम केले होते. राजकीय नाट्यावर आधारित ‘डर्टी पॉलिटिक्स’ या आगामी चित्रपटात बिग बींसोबत काम करण्याचा बोकाडिया विचार करत आहेत. या चित्रपटात मल्लिका शेरावत काम करत असून तिची भूमिका राजस्थानमधील शक्तिशाली नेत्याद्वारे हत्या केली गेलेल्या परिचारिका भवरी देवीच्या व्यक्तिमत्वावर आधारित आहे. या हत्यांकांडाविषयी तपास करणा-या पत्रकाराची भूमिका ही खासकरुन अमिताभ बच्चन यांच्यासाठी लिहील्याचे बोकाडियांनी सांगितले. मात्र, अमिताभ बच्चन या भूमिकेसाठी उत्सुक दिसत नसल्याने अमिताभ बच्चनऐवजी नसिरुद्दीन शाह यांना सदर भूमिकेसाठी चित्रपटात घेण्यात आले आहे. अमिताभ बच्चनसाठी राखून ठेवलेली भूमिका नसिरुद्दीन शाह यांना मिळण्य़ाची ही पहिलीच वेळ आहे.
नासिर यांच्या भूमिकेबाबत सांगताना बोकाडिया म्हणाले की, ही भूमिका एका नीडर पत्रकाराची आहे. त्यासाठी मला भारदस्त आवाजाची गरज होती. माझ्या दृष्टीने यासाठी अमिताभ बच्चन किंवा नासिरुद्दीन शाह यांच्याशिवाय दुसरे कोणी योग्य असूच शकत नाही.