दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा आज वाढदिवस आहे. नसीरुद्दीन यांचा जन्म उत्तरप्रदेशच्या बाराबंकीमध्ये झाला. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. चित्रपटसृष्टीत त्यांनी एकाहून एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. नसीरुद्दीन यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार क्वचित लोकांना माहीत असेल.

नसीरुद्दीन यांचं पहिलं लग्न वयाच्या २०व्या वर्षी झालं. त्यांची पहिली पत्नी मनारा सिकरी ऊर्फ परवीन मुराद या त्यांच्यापेक्षा वयाने १५ वर्षांनी मोठ्या होत्या. या दोघांना एक मुलगी झाली. जिचं नाव हीबा शाह ठेवण्यात आलं. पण हे लग्न वर्षभरदेखील टिकलं नाही.

नसीरुद्दीन शाह आणि त्यांच्या पत्नी रत्ना पाठक

पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर नसीरुद्दीन यांनी रत्ना पाठक यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. लग्नापूर्वी त्यांच्यासोबत ते बराच काळ लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिले. रत्ना पाठक या नसीरुद्दीन शाह यांच्यापेक्षा १४ वर्षांनी लहान आहेत. दुसऱ्या लग्नानंतर नसीरुद्दीन शाह यांना दोन मुलं झाली त्यांची नाव इमाद व विवान अशी आहेत.

रत्ना दीना पाठक यांची मुलगी आणि पंजक कपूर यांची पत्नी सुप्रिया पाठक यांची सख्खी बहीण आहे. या नात्याने त्या शाहिद कपूरच्या मावशी आहेत. शाहिदच्या लग्नात रत्ना आपल्या कुटुंबासोबत सहभागी झाल्या होत्या.