06 December 2020

News Flash

नसीरुद्दीन शाह यांच्या मुलाला करोनाची लागण

'सात खूप माफ' या चित्रपटातून विवानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

विवान शाह

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा विवानला करोनाची लागण झाली आहे. विवानने एका वेबसाइटला यासंदर्भातील माहिती दिली आहे. “होय, माझी तब्येत बरी नाही कारण मला करोनाची लागण झाली आहे”, असं त्याने स्पष्ट केलं.

विशाल भारद्वाज यांच्या ‘सात खूप माफ’ या चित्रपटातून विवानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘हॅपी न्यू इअर’ या मल्टिस्टारर चित्रपटात त्याने भूमिका साकारली. या चित्रपटात दीपिका पदुकोण, शाहरुख खान, बोमन इराणी, अभिषेक बच्चन आणि सोनू सूद यांच्यासोबत त्याने स्क्रीन शेअर केला.

आणखी वाचा : “तिला लाजच नाही”; प्राजक्ता गायकवाडवर भडकल्या अलका कुबल

याआधी अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली होती. यामध्ये अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, मल्याळम अभिनेते पृथ्वीराज सुकुमारन, तमन्ना भाटिया, टीव्ही अभिनेत्री सारा खान, अर्जुन कपूर, मलायका अरोरा यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 9:52 am

Web Title: naseeruddin shah son vivaan tests positive for covid 19 ssv 92
Next Stories
1 वादग्रस्त वक्तव्यांमुळे नव्हे, तर ‘या’ कारणामुळे होते कंगनाची चर्चा
2 शाहरुख ठरला बुर्ज खलिफावरचा ‘किंग’; फोटो पाहून व्हाल थक्क
3 उत्तर प्रदेशमध्ये ‘ससुरा बडा पइसा वाला २’ला तुफान प्रतिसाद; बॉक्स ऑफिसवरही सुसाट
Just Now!
X