13 December 2018

News Flash

भाऊ कदम ठरला ‘नशीबवान’

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव'च्या (पिफ) स्पर्धा विभागातही या चित्रपटाची निवड झाली आहे.

भाऊ कदम

विविध राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या आणि पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे सिनेमॅटोग्राफर अमोल वसंत गोळे आता चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. ‘नशीबवान’ असे या चित्रपटाचे नाव असून, चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

वाचा : मनालीमधील कंगनाच्या नव्या घराची किंमत माहितीये का?

‘नशीबवान’ चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता भाऊ कदम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. फ्लाईंग गॉड फिल्मस् प्रस्तुत ‘नशीबवान’ चित्रपटाचे निर्माते अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड, महेंद्र गंगाधर पाटील आहेत. प्रशांत विजय मयेकर यांनी सह निर्मती केली आहे. ११ ते १८ जानेवारी दरम्यान संपन्न होत असलेल्या यंदाच्या ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’च्या (पिफ) स्पर्धा विभागातही या चित्रपटाची निवड झाली आहे.

वाचा : हनीमूनला गेलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावे लागले एअरलिफ्ट!

‘नशीबवान’च्या दिग्दर्शनासह कथा – पटकथा – संवाद आणि सिनेमॅटोग्राफी अशी जबाबदारी अमोल वसंत गोळे यांनी सांभाळली आहे. गोळे यांची निर्मिती असलेल्या ‘रंगा पतंगा’ या चित्रपटाला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट पुरस्कार, ‘पिफ’मध्ये (२०१६) संत तुकाराम सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटाला ‘पिफ’मध्ये (२०१५) संत तुकाराम सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार आणि गोळे यांना बेस्ट सिनेमॅटोग्राफी पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांनी सिनेमॅटोग्राफी केलेल्या ‘हा भारत माझा’ ला ‘पिफ’मध्ये संत तुकाराम पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

First Published on January 12, 2018 12:42 pm

Web Title: nashibvaan frist look bhau kadam in lead role