25 February 2021

News Flash

हार्दिक पांड्याची पत्नी नताशाने सासऱ्यांच्या आठवणीत लिहिली भावनिक पोस्ट

सध्या तिची ही पोस्ट चर्चेत आहे.

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्या यांचे वडील हिमांशु पांड्या यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर वडिलांच्या आठवणीमध्ये एक पोस्ट लिहिली होती. आता त्यापाठोपाठ हार्दिकची पत्नी नताशाने देखील एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

नताशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलगा अगस्त्य आणि सासरे हिमांशु पांड्या यांचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनही दिले आहे. ‘तुम्ही आम्हाला सोडून गेले आहात यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. तुम्ही आपल्या घरातील एक सर्वात कणखर आणि मजेशीर व्यक्ती होतात. तुमच्या अनेक आठवणी आमच्यासोबत आहेत पण तुमच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे. मला आनंद आहे की तुम्ही तुमचे जीवन एका बॉस आणि एका रॉकस्टार प्रमाणे जगलात. मी अगस्त्यला त्याच्या आजोबांच्या गोष्टी नक्की सांगेन’ या आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by (@natasastankovic__)

नताशाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये एक व्हिडीओ देखील आहे. या व्हिडीओमध्ये हिमांशु पांड्या हे अगस्त्य सोबत खेळताना दिसत आहेत. यापूर्वी हार्दिकने वडिलांसोबतचे फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिली होती. ‘माझे वडील, माझे हिरो…तुम्हाला आम्ही गमावलं. ही गो्ष्ट आम्ही आयुष्यात कधीही स्वीकारू शकत नाही. पण तुम्ही आमच्यासाठी गोड आठवणी ठेवून गेलात. आज तुमची मुलं जे काही मिळवू शकली आहेत, ते फक्त तुमच्यामुळे’ असे त्याने पोस्टमध्ये म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2021 5:00 pm

Web Title: natasa stankovic gets emotional as she writes note for hardik pandya late father avb 95
Next Stories
1 करण जोहरच्या आगामी चित्रपटात दिसणार विजय देवरकोंडा, फर्स्ट लूक व्हायरल
2 राम मंदिरासाठी योगदान दिल्यानंतरही अक्षय होतोय ट्रोल; जाणून घ्या कारण
3 Video: मानसी नाईकच्या आईने घेतला भन्नाट उखाणा, सोशल मीडियावर रंगली चर्चा
Just Now!
X