News Flash

विराट-हार्दिक पुश-अप्सवर चॅलेंज: पाहा नताशाची रोमँटिक कमेंट

पाहा काय म्हणाली नताशा

हार्दिक पांड्या हा आपल्या फिटनेसच्या बाबतीत खूप कडक शिस्तीचा आहे. तो बऱ्याचदा आपले जिममधील वर्कआऊटचे व्हिडीओ पोस्ट करत असतो. या वेळी हार्दिकने एक असा व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात तो उड्या मारत पुश-अप्स करताना दिसला. साहजिकच या अनोख्या पुश-अप्सची चाहत्यांना भुरळ पडली. केवळ चाहतेच नव्हे, तर बॉलिवूड अभिनेत्री आणि महिला क्रीडापटूही या पुश-अप्सवर फिदा झाल्याचे दिसून आले. हार्दिकच्या या व्हिडीओला कॅप्टन कोहलीने दमदार उत्तर दिलं. पण त्यावर हार्दिकने जो व्हिडीओ पोस्ट केला, त्यावर हार्दिकची पत्नी नताशा हिने हार्दिकसंबंधी रोमँटिक रिप्लाय दिला.

विराटने आधी ‘फ्लाईंग पुश-अप्स’मध्ये थोडा ट्विस्ट करत नवा प्रकार शोधला. पुश-अप्स मारताना उड्या तर त्याने मारल्याच, पण त्यासह त्याने हवेत असताना टाळ्याही वाजवून दाखवल्या. या नव्या ट्विस्टवर चाहते भलतेच खुश झाले. विराटने दमदार पुश-अप्स चॅलेंज दिल्यावर, ‘हार मानणं हे टीम इंडियाच्या खेळाडूंच्या रक्तातच नाही’, हे हार्दिकने दाखवून दिलं. हार्दिकने कोहलीला दमदार प्रत्युत्तर दिलं. त्याने फ्लाईंग पुश-अप्स मारल्या. हवेत असताना टाळ्यादेखील वाजवल्या, पण महत्त्वाचं म्हणजे त्याने मागच्या बाजूला टाळ्या वाजवण्याचा पराक्रम करून दाखवला.

विराट यावर काय उत्तर देतो? याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलं होतं. विराटने त्याच्या व्हिडीओवर ‘कमाल वर्कआऊट’ अशी कमेंट केली. तर हार्दिकची पत्नी नताशी हिने अतिशय रोमँटिक अशी कमेंट केली. माझी बेबू सगळ्यात मस्त आहे, अशी कमेंट तिने केली.

हार्दिकच्या हा व्हिडीओ सध्या जोरदार चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 6:46 pm

Web Title: natasa stankovic romantic comment hardik pandya virat kohli flying hop push ups challenge vjb 91
Next Stories
1 ‘ब्रीद’च्या दुसऱ्या सिझनमध्ये अभिषेक बच्चनसोबत दिसणार हृषिकेश जोशी
2 अक्षय विसरला होता ट्विंकलचा वाढदिवस, अचानक द्यावे लागले होते ‘हे’ गिफ्ट
3 Video : वादक ते संगीतकार ;अशोक पत्की यांचा संगीतमय प्रवास
Just Now!
X