15 July 2020

News Flash

नताशाचे लग्न आणि आई होण्यावर एक्स बॉयफ्रेंड अली गोणी म्हणाला…

नताशा आणि अलीने एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता.

गेल्या काही दिवसांपासून मॉडेल नताशा स्टेनकोविक आणि हार्दिक पांड्या चर्चेत आहेत. या चर्चा नताशाने सोशल मीडियावर क्रिकेटपटू हार्दिक पांड्याशी लग्न केले असून ते लवकरच एका बाळाला जन्म देणार असल्याचे एका पोस्टद्वारे सांगितल्यामुळे सुरु झाल्या आहेत. त्यानंतर चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत तिला शुभेच्छा दिल्या. तसेच नताशाचा एक्स बॉयफ्रेंड अली गोणीने देखील तिच्या या पोस्टवर कमेंट केली आहे.

अलीने कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘गॉड ब्लेस यू गाइज…’ असे म्हणते त्याने हार्ट इमोजी कमेंटमध्ये पोस्ट केला आहे.

नताशा आणि अलीने एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी त्या दोघांची जोडी चाहत्यांच्या विशेष पसंतीला उतरली होती. त्या दोघांमधील केमिस्ट्री पाहून त्यांचा ब्रेकअप होईल असे चाहत्यांना कधीच वाटले नव्हते. पण २०२०च्या सुरुवातीलाच हार्दिकने नताशासोबत साखरपुडा केला आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

नताशा बॉलिवूडमधील लोकप्रिय रॅपर बादशाहच्या ‘डीजे वाले बाबू’ या सुपरहिट गाण्यात दिसली होती. तसेच ती सलमानच्या बिग बॉस या वादग्रस्त शोमध्ये देखील सहभागी झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 8:09 pm

Web Title: natasa stankovics ex aly goni wishes her on pregnancy wedding with hardik pandya avb 95
Next Stories
1 ‘ही’ अभिनेत्री सोनू सूदला करतेय मदत; नेटकरी म्हणाले ही तर ‘सुपरवुमन’
2 लॉकडाउनमध्ये मुंबईतील व्हिडीओ शूट करून अभिनेत्री करतेय प्रेक्षकांचं मनोरंजन
3 महिला आरोग्य कार्यकर्त्यांच्या शॉट फिल्मची कमाल; २४ तासांत मिळाले ४० लाख व्हूज
Just Now!
X