News Flash

हार्दिक पांड्यासोबत नताशाचा रोमांस, शेअर केला पूलमध्ये किस करतानाचा फोटो

सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल

भारताचा क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक हे एक लोकप्रिय कपल आहे. नताशा आणि हार्दिक सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चागलेच व्हायरल होताना दिसतात.

नताशा कायम तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ग्लॅमरस फोटो शेअर करून चाहत्यांच लक्ष वेधून घेत असते. नुकताच नताशाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती हार्दिक पांड्यासोबत स्विमिंग पूल मध्ये दिसतेयं. हा फोटो शेअर करत नताशाना कॅप्शन दिलंय. “माझा सनशाईन हार्दित पांड्या” असं कॅप्शन देत तिने हार्दिक पांड्या तिच्या आयुष्यातील सूर्यप्रकाश असल्याचं म्हंटलं आहे.

नताशा आणि हार्दिकचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या फोटोत नताशा आणि हार्दिक स्विमिंग पूलमध्ये असून नताशा हिर्दिकच्या गालावर किस करताना दिसतेय. चाहत्यांनी हा फोटो पंसत केला आहे. अनेकांनी या फोटोला हार्टचे इमोजी दिले आहेत.तर हार्दिक पांड्यानेदेखील नताशाने शेअर केलेल्या फोटोला कमेंच बॉक्समध्ये हार्टचे इमोजी दिले आहेत. या काही तासातच पाच लाखांहून अधिक लाईकस् मिळाले आहेत.

या आधी नताशाने एक व्हिडीओ शेअर केला होता. यात ती बिकनीमध्ये फ्लॉन्ट करताना दिसत होती. नताशा मुलगा अगत्स्यसोबतही अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 10:00 am

Web Title: natasha stankovics kissing hardik pandya in phota viral says my sunshine kpw 89
टॅग : Bollywood,Entertainment
Next Stories
1 RRR सिनेमातील ‘राम’चा लूक रिलीज; असा आहे सीताचा बलवान, धनुर्धर राम!
2 परेश रावल यांना करोनाची लागण; १८ दिवसांपूर्वीच घेतला होता करोना लसीचा पहिला डोस
3 जिच्या हातावर थुंकलो ती नंबर वन; आमिरच्या कृत्याने जूही चावला संतापली
Just Now!
X