News Flash

‘मिस्टर इंडिया’, ‘राम लखन’ फिल्मचे एडिटर वामन भोसले यांचे निधन

बॉलिवूड सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली

बॉलिवूड राष्ट्रीय पुरस्कार विजेते फिल्म एडिटर वामन भोसले यांचे निधन झाले. आज २६ एप्रिल रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. वामन अनेक आजारांनी त्रस्त होते. वामन भोसले यांनी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीच्या चार दशकांमध्ये ‘मौसम’, ‘हिरो’, ‘कर्झ’, ‘राम लखन’, ‘सौदागर’, ‘अग्निपथ’ सारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांसाठी काम केले आहे.

अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आणि म्हणाले, “मास्टर फिल्म एडिटर वामन भोसले यांच्या निधनाने मला दु: ख झाले आहे. माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्याबरोबर काम करण्याचा मला बहुमान मिळाला. ‘आंधी’, ‘कर्ज’, ‘मिस्टर इंडिया’, ‘राम लखन’, ‘अग्निपथ’, ‘सौदागर’, ‘गुलाम’ यासारख्या चित्रपटांसाठी ते नेहमीच आठवणीत राहतील.”

दिग्दर्शक सुभाष घई यांनी देखील ट्वीट केले. “तुमच्या आत्म्याला शांती मिळो वामन भोसले सर… माझा पहिला चित्रपट ‘कालिचरण’पासून ‘खलनायक’पर्यंत यांनी माझे चित्रपट एडिट केले. ‘ताल’ या चित्रपटाला एडिट करण्यासाठी मला एका शिक्षकासारखे शिकवले. तुम्ही एक उत्तम शिक्षक होतात”, अशा आशयाचे ट्वीट सुभाष घई यांनी केले.

वामन भोसले यांनी १९६९ मध्ये प्रदर्शित झालेल्या राज खोसला यांच्या ‘दो रास्ते’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. १९७७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इनकार’ या चित्रपटासाठी वामन यांना सर्वोत्कृष्ट एडिटरचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 6:55 pm

Web Title: national award winning film editor waman bhonsle dies and bollywood celebrities pays a tribute dcp 98
Next Stories
1 “मी त्याला थोबाडीत मारली तर त्याने मला बुक्की मारली, मला काही….”- फातिमा सना शेख
2 सोनू सूदकडे २० हजारांहून अधिक लोकांनी मागितली मदत; म्हणाला,”…”
3 नुसतंच बोलबच्चन नाही तर कृतीसुद्धा; अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केलं रक्तदान!
Just Now!
X