‘रंगपीठ, मुंबई’ या संस्थेतर्फे बीड जिल्ह्य़ातील केज तालुक्यामधील दरडवाडी येथे ८, ९ आणि १० फेब्रुवारी रोजी पाचव्या राष्ट्रीय भारूड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भारूड या लोककलेला महामंच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. वामन केंद्रे यांनी आपले वडील भारूडकार कै. माधवराव केंद्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या महोत्सवाचे आयोजन केले आहे.  व्यावसायिक आणि पारंपरिक भारूडकारांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच नव्या पिढीत भारूड कलावंत घडविण्याच्या दृष्टीने या महोत्सवात विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. भारूड कलावंतांमध्ये आपल्या कलेसंदर्भात वैचारिक आदानप्रदान व्हावे यासाठी एकपरिसंवादही आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धात्मक महोत्सवात प्रथम, द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या भारूड संचास गुणानुक्रमे ३० हजार, २० हजार आणि दहा हजार रुपये रोख पारितोषिकासह सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रे देण्यात येतील. याखेरीज भारूड कलेतील व्यक्तिगत प्रावीण्याबद्दलही विविध पारितोषिके दिली जातील. या महोत्सवासाठी प्रवेश अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख २५ जानेवारी असून, अधिक माहितीसाठी महोत्सवाच्या संयोजक गौरी केंद्रे यांच्याशी मोबाईल क्र. ९९२०८६८६२८ अथवा अशोक केंद्रे- मोबाईल क्र. ९९२०१२२१९७ यांच्याशी संपर्क साधावा. ई-मेल : rangpeeththeatre@gmail.com/