News Flash

नट्टू काकांना येते दया बेनची आठवण, म्हणाले..

त्यांनी एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील जेठालाल, भिडे, दयाबेन, पोपटलाल, नट्टू काका हे पात्र कायमच चर्चेत असतात. पण गेल्या कित्येक दिवसांपासून दया बेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी ही शोमध्ये दिसत नाही. तसेच करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे नट्टू काकांना देखील सेटवर जाण्यास परवानगी देण्यात आली नव्हती.

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत नट्टू काका हे पात्र घनश्याम नायक यांनी साकारली आहे. आता ते पुन्हा मालिकेमध्ये काम करताना दिसत आहेत. त्यांना पुन्हा मालिकेत पाहून सर्वांना आनंद झाला आहे. नट्टू काकांनी नुकतीच टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीदरम्यान त्यांनी दया बेनला सेटवर मिस करत असल्याचे म्हटले आहे.

‘आम्ही सेटवर दिशाला मिस करतो. तिने शोच्या निर्मात्यांना परत येणार असल्याचे सांगावे आणि कन्फर्मेशन द्यावे. बाकी गोष्टी निर्मात्यांवर आधारित आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेची संपूर्ण टीम तिला मिस करत आहे’ असे नट्टू काकांनी म्हटले आहे.

घनश्याम हे गेल्या १२ वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत नट्टू काकांची भूमिका साकारत आहेत. त्यामुळे त्यांना खऱ्याखुऱ्या आयुष्यातही अनेकजण नट्टू काका म्हणूनच आवाज देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 7:06 pm

Web Title: nattu kaka taarak mehta ka ooltah chashmah talk about disha vakani come back avb 95
Next Stories
1 तैमूरनंतर सोशल मीडियावर सुरु आहे ‘या’ स्टार किडची चर्चा
2 सलमानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ईदला रिलीज होणार ‘राधे’ चित्रपट
3 चक दे इंडिया… ! भारताच्या ऐतिहासिक विजयावर शाहरुखचं खास ट्विट
Just Now!
X