03 June 2020

News Flash

भद्रकालीचा चार दिवसांचा नाटय़ महोत्सव!

अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक मच्छिंद्रकांबळी यांच्या ६८ व्या जयंती निमित्ताने भद्रकाली नाटय़ संस्थेतर्फे २ ते ५ एप्रिल या कालावधीत नाटय़ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

| April 1, 2015 06:46 am

अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक मच्छिंद्रकांबळी यांच्या ६८ व्या जयंती निमित्ताने भद्रकाली नाटय़ संस्थेतर्फे २ ते ५ एप्रिल या कालावधीत नाटय़ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसांच्या या महोत्सवात दहा नाटके सादर होणार आहेत.
२ एप्रिल रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार असून त्यानंतर दिवसभरात ‘नांदी’, ‘समुद्र’ आणि ‘वस्त्रहरण’ ही नाटके सादर होणार आहेत. ३ एप्रिल रोजी ‘बिनधास्त पाहा बीपी’, ‘बेचकी’, ‘सुखाशी भांडतो आम्ही’ ही नाटके, तर ४ एप्रिल रोजी ‘करायचं ते दणक्यात’ व ‘पांडगो इलो रे बा इलो’ ही नाटके सादर होणार आहेत.
५ एप्रिल रोजी ‘आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे’ आणि ‘जस्ट हलकं फुलकं’ या नाटकांनी महोत्सवाचा समारोप होणार आहे. नाटय़ महोत्सवातील सर्व नाटके यशवंत नाटय़ मंदिर, माटुंगा येथे सादर होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2015 6:46 am

Web Title: natya mahotsav by bhadrakali production
टॅग Marathi
Next Stories
1 ‘कपडे आणि सेक्स’चे स्वातंत्र्य म्हणजे सशक्तीकरण नाही- दीपिकाच्या ‘माय चॉईस’वर सोनाक्षीचे मत
2 चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळणे कठीण – गौतम गुलाटी
3 एक अभिनेत्री आणि नर्तकी म्हणून माझ्यात सुधारणा- सनी लिओनी
Just Now!
X