News Flash

भालेराव कुटुंब येतंय तुमच्या भेटीला

भालेराव कुटुंब अजून कोणत्या नवीन अडचणींना तोंड देईल?

भालेराव कुटुंबाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं आणि प्रभाकर, प्रशांत, रवी, उदय ही चार भावंडं सगळ्यांना आपलीशी वाटू लागली. लग्न होतंय की नाही, अशी परिस्थिती असताना रुक्मिणीबाईंचे नवस फळाला आले आणि काटे कुटुंबातल्या चार बहिणींशी चारही भावांची लग्न एकाच मंडपात झाली. भालेरावांचं घर एकदाचं सुनांनी भरलं आणि रुक्मिणीबाईंचा जीव भांड्यात पडला.

लग्न झालं तर खरं, पण आता चारही संसार सुखानं होतायत की नाही, अशी चिंता रुक्मिणीबाईंना लागून राहिली. भालेराव कुटुंब अजून कोणत्या नवीन अडचणींना तोंड देईल आणि त्यातून कसं बाहेर पडेल, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. या प्रश्नांची उत्तरं आता ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मालिकेच्या नवीन भागांत प्रेक्षकांना मिळणार आहेत. सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता सोनी मराठीवर नवीन भाग सुरू होताहेत.

लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांची आणि भालेराव कुटुंबाची भेट झाली नव्हती, पण आता मात्र मालिकेचं चित्रीकरण सुरू झालं असून भालेराव कुटुंब प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येतंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 4:42 pm

Web Title: navri mile navryala new episodes starting soon ssv 92
Next Stories
1 श्री गुरुदेव दत्त साकारल्यानंतर आता मंदार जाधव दिसणार नव्या रुपात
2 ‘जय महाराष्ट्र’ म्हणत अमेरिकेतील डॉक्टर करतोय रुग्णांची सेवा; अवधूत गुप्तेने केलं कौतुक
3 Video : बहुचर्चित ‘बंदिश बॅडिट्स’चा ट्रेलर प्रदर्शित
Just Now!
X