हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिचा डान्स करतानाचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला असून, त्यावर सोशल मीडियावर बरीच चर्चा होते आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर कपूरच्या ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातील दिल्लीवाली गर्लफ्रेंड या गाण्यावर ती डान्स करताना दिसते आहे.

सोशल मीडियावर नव्या तिच्या कुटुंबासोबतच्या स्टायलिश छायाचित्रांसाठी प्रसिद्ध आहे. हा तिच्या मसाज रुममधील खासगी शोचा व्हिडिओ असून, तो तिच्या मैत्रिणीने रेकॉर्ड केल्याचे समजते. कारण व्हिडिओमध्ये या मैत्रिणीचा आवाजही रेकॉर्ड झाला आहे.

या व्हिडिओमध्ये नव्या दिलखुलास नाचत असल्याचेही दिसते आहे. नव्या अमिताभ आणि जया बच्चन यांची अतिशय लाडकी असून, ती अनेकदा सुटीसाठी बच्चन कुटुंबियांसोबत असते. त्यांच्यासोबत तिचे असणारे बॉंडिंगही याआधी सर्वांना दिसले आहे.

https://www.instagram.com/p/BT1RTT9jR8d/

नव्या अभिनय क्षेत्रात जाईल याची आपल्याला चिंता आहे, असे श्वेता बच्चन- नंदा यांनी नुकतेच आपल्या एका मुलाखतीत म्हटले होते.