News Flash

पोलंडमधील गर्भपाताच्या नव्या कायद्यावर बिग बींची नात म्हणते …

पोलंडमध्ये गर्भपाताविषयी असलेले कायदे केले आणखी कठोर

युरोपीय देश पोलंडमध्ये गर्भपाताविषयी असलेले कायदे आणखी कठोर करण्यात आले आहेत. पोलंडमध्ये आता गर्भपात करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हा मुद्दा चांगलाच चर्चिला जात आहे. यामध्येच बिग बींची नात नव्या नवेली नंदा हिने भाष्य केलं आहे.

अलिकडेच नव्याने तिचं सोशल मीडिया अकाऊंट प्रायव्हेटवरुन पब्लिक केल आहे. यामध्ये तिने नुकतेच काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. या स्क्रिनशॉट्ससोबत तिने तिचे विचारदेखील व्यक्त केले आहेत.’अत्यंत दुःखद’ असं म्हणत तिने पोलंडमधील गर्भपाताविषयी घेण्यात आलेल्या कठोर निर्णयावर मत व्यक्त केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Navya Naveli Nanda (@navyananda)


दरम्यान, पोलंडमध्ये गर्भपाताविषयीचे कायदे कठोर करण्यात आले आहेत. या कायद्यानुसार, महिलांना गर्भपात करता येणार नाही. जन्माला न आलेली मुलं देखील एक व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांचंदेखील संरक्षण केलं गेलं पाहिजे. त्यांना जगण्याचा अधिकार आहे. तसंच जर बलात्कार झाल्यानंतर किंवा आईची प्रकृती स्थिर नसेल तर गर्भपात करता येईल असा निर्णय येथील न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हा एकच मुद्दा चर्चिला जात आहे. पोलंडमधील अनेक महिला या निर्णयाविरुद्ध रस्त्यावर उतरल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2021 12:39 pm

Web Title: navya naveli nanda reaction on ban on abortion in poland ssj 93
Next Stories
1 प्रतिक्षा संपली! ‘केजीएफ चॅप्टर 2’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर
2 ‘रामायण’ पुन्हा पडद्यावर; बिग बजेट चित्रपटात दीपिका-हृतिकची वर्णी
3 फरहान अख्तरला दिलासा; ‘मिर्झापूर’ प्रकरणावर उच्च न्यायालयाने दिला निर्णय
Just Now!
X