News Flash

अमिताभ बच्चन यांच्या नातीने दिल्या बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा?

तिने शेअर केलेला फोटो सध्या चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ती नेहमीच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. या सगळ्यामुळे नव्या नेहमीच चर्चेत असते. आता नव्याने तिचा कथीत बॉयफ्रेंड म्हणजेच जावेद जाफ्री यांचा मुलगा मीजान याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

नव्याने मीजानच्या वाढदिवसानिमित्ताने त्याचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. या फोटोत मीजान एका सुंदर ठिकाणी असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत नव्याने “वाढदिवसाच्या शुभेच्छा मीजान” असे कॅप्शन दिले आहे. मीजानच्या या फोटोने सगळ्या नेटकऱ्यांते लक्ष वेधले आहे. नव्याने पहिलांदाच मीजानचा फोटो शेअर केला असं नाही तर या आधीही मीजान आणि नव्याने एकमेकांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार,  “लोकांना चर्चा करण्यासाठी कोणता तरी विषय पाहिजे. कोणाबरोबर आपली चांगली मैत्री असणे या देखील काही वेगळे समजले जाते. हे दोघे एकत्र मोठे झाले आहेत, माझी मुलगी आणि नव्या शाळेत असल्यापासून चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यांचे मित्र ही सारखे आहेत. अगदीच सारा आणि मीजान एकाच शाळेत होते. ते सगळे घरी यायचे आणि सकाळी ३ वाजे पर्यंत इथेच असायचे. नेहमी एकत्र असल्याने त्यांच नाव एकत्र घेण सोप आहे.” असे जावेद जाफ्री नव्या आणि मीजानच्या रिलेशनशिपबद्दल म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Meezaan (@meezaanj)

मीजान लवकरच ‘हंगामा २’ या चित्रपटात दिसणार आहे. “विशेष म्हणजे या चित्रपटासाठी दिग्दर्शकाची पहिली पसंत मी नव्हतो. त्यांची पहिली पसंत ही आयुषमान खुराना आणि कार्तिक आर्यन होते. त्या दोघांनी नकार दिल्याने दिग्दर्शक प्रियां सरानी मला या चित्रपटासाठी विचारले.” असे मीजान एका मुलाखतीत म्हणाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 12:56 pm

Web Title: navya naveli nanda wishes rumoured boyfriend meezaan on his birthday with a stunning pic dcp 98
Next Stories
1 अशी असते अमृताच्या दिवसाची सुरूवात, योगासोबत योग्य सकाळ
2 ‘हे मन बावरे’मधील अभिनेत्याने केले दुसऱ्यांदा लग्न
3 करोनाचं संकट असूनही जान्हवी करतेय प्रमोशन, कारण..
Just Now!
X