News Flash

नवाझुद्दीन सिद्दिकीचा नवा चित्रपट येतोय….

कालपासून झाली या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात

सौजन्यः नवाझुद्दीन सिद्दिकी ट्विटर

अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकीने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. वेबसीरीजच्या विश्वातही त्यानं दमदार कामगिरी केली आहे. सध्या तो एका नव्या चित्रपटात काम करतोय. आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून त्यानं ही माहिती दिली आहे.

नवाजने काल आपल्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने त्याच्या नव्या चित्रपटाविषयी सांगितलं आहे.
‘जोगीरा सारा रारा’ ह्या चित्रपटात तो काम करत आहे. या चित्रपटाचं शूटिंग काल सुरु झाल्याची माहिती नवाजने आपल्या पोस्टमधून दिली आहे.

या चित्रपटात त्याच्या सोबत अभिनेत्री नेहा शर्मा काम करत आहे. हा चित्रपट रोमँटिक कॉमेडी असून गालिब असद भोपाली यांनी लिहिलेला आहे. कुशन नंदी हे या चित्रपटाचे निर्माते असून नवाझुद्दीनसोबतचा हा त्यांचा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्यांनी 2017 साली ‘बाबूमोशाय बंदुकबाज’ या ऍक्शन चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

नवाझुद्दीनने आपल्या करीयरची सुरुवात आमीर खानच्या ‘सरफरोश’ या चित्रपटातून केली. त्यानंतर बऱ्याच चित्रपटांतून त्याने सहाय्यक भूमिका केल्या. ‘सेक्रेड गेम्स’ या नेटफ्लिक्सच्या वेबसीरीजमधली त्याची गणेश गायतोंडे ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. ‘ठाकरे’ चित्रपटात त्याने साकारलेली बाळासाहेब ठाकरेंची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 11:53 am

Web Title: nawajuddin siddiqui neha sharma starrer new film shooting started vsk 98
Next Stories
1 ‘गंगूबाई काठियावाडी’च्या भूमिकेतील आलियाला नापसंती? सोशल मीडियावर प्रेक्षक सुचवतायेत पर्याय
2 ‘त्या’ धक्कादायक प्रसंगानंतर गंगाने शेअर केला नवा व्हिडीओ; म्हणाली…
3 केवळ अट्टहास…
Just Now!
X