महाराष्ट्रात करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्यामुळे लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपटांचे चित्रीकरण देखील थांबवण्यात आले आहे. यासगळ्या गोष्टी पाहता अनेक सेलिब्रिटी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बाहेर गेले आहेत. हे पाहता बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने या सगळ्यांवर निशाना साधला आहे.

‘स्पॉटबॉय’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘नवाजला सेलिब्रिटींच्या सुट्टी आणि तिथून शेअर करत असलेल्या फोटोंबद्दल विचारण्यात आले.’ तेव्हा यावर बोलताना तो म्हणाला, ‘लोकांकडे अन्न नाही आणि आपण पैसे असे व्यर्थ करत आहात. थोडी तरी लाज वाटू द्या.’

यावर पुढे तो म्हणाला, ‘ते लोक कशाबद्दल बोलतील? अभिनयाबद्दल? या लोकांनी मालदीवचा तमाशा बनवला आहे. त्यांच्या पर्यटन उद्योगाची काय व्यवस्था आहे मला नाही माहित. पण माणूस म्हणून कृपया आपल्या सुट्टीचे फोटो तरी आपल्यकडे ठेवा सोशल मीडियावर शेअर करू नका. प्रत्येक व्यक्ती इथे कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतं आहे. जे आधीच अनेक समस्यांचा सामना करावा लागतं आहे, हे फोटो दाखवून त्यांना आणखी दुख: देऊ नका.’

पुढे नवाज म्हणाला, ‘आपण कलाकारांनी मोठे होणे आवश्यक आहे. त्यामुळे मालदीवला सुट्टीचा आनंद घेण्यासाठी जाण्याची कोणतीच योजना नाही? मुळीच नाही. मी माझ्या कुटुंबासोबत माझ्या गावी बुधाणात आहे. हेच माझं मालदीव आहे.’