News Flash

नवाजुद्दीन सिद्दिकीच्या भावावर लैंगिक शोषणाचे आरोप; पुतणीने केली तक्रार दाखल

अल्पवयीन पुतणीवर नवाजुद्दीनच्या भावाकडून लैंगिक शोषण झाल्याचे आरोप

नवाजुद्दीन सिद्दिकी

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीच्या भावावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. नवाजुद्दीनच्या पुतणीनेच हे आरोप केले असून तिने दिल्लीतल्या जामिया पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पुतणीने ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला. “मी नऊ वर्षांची असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. याविषयी माझ्या काकांविरोधात मी तक्रार दाखल केली आहे. मी दोन वर्षांचे असताना माझ्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. माझ्या सावत्र आईने माझा खूप छळ केला. मी लहान असताना मला समजलं नाही, पण आता मला कळतंय की तो स्पर्श चुकीचा होता. माझं लैंगिक शोषण करण्यात आलं.”

नवाजुद्दीनच्या पुतणीचं लग्न झालं असून तिच्या सासरच्यांनाही त्रास देण्यात येत असल्याचं तिने सांगितलं. “माझ्या लग्नानंतरही माझे वडील, मोठे काका नवाज यांनी सासरच्यांविरुद्ध खोटे खटले दाखल करून त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माझ्यावर कधीच विश्वास ठेवला नाही. आतासुद्धा दर सहा महिन्यांनी माझे वडील खोटे खटले दाखल करतात आणि आता माझ्या तक्रारीनंतरही ते काहीतरी करतील हे निश्चित आहे. पण माझ्या पतीची मला खंबीर साथ आहे. शारीरिक शोषणाचे पुरावे माझ्याकडे आहेत”, असं तिने स्पष्ट केलं.

या संपूर्ण प्रकरणात नवाजुद्दीनकडून कोणतीही मदत न मिळाल्याचंही तिने सांगितलं. “माझे मोठे काका नवाजुद्दीन यांना मी माझ्यासोबत घडलेलं सगळं काही सांगितलं होतं. पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. नवाजुद्दीन मला समजू शकतील असं वाटलं होतं, पण काका असं माझ्यासोबत नाही करू शकत म्हणत त्यांनी त्या गोष्टीवर पडदा टाकला”, असं ती म्हणाली. नवाजुद्दीनची पुतणी सध्या दिल्लीत पतीसोबत राहत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 10:25 am

Web Title: nawazuddin siddiqui niece alleges sexual harassment by his brother files complaint in delhi ssv 92
Next Stories
1 ‘…आणि मी त्या आज्ञेचं पालन केलं’; लग्नाच्या वाढदिवशी बिग बींची खास पोस्ट
2 राजकारणात प्रवेश करणार का?; सोनू सूद म्हणतो..
3 निसर्ग वादळ: प्रियांकाला चिंता मुंबईची; म्हणते, “१८९१ पासून एकदाही वादळ मुंबईला धडकले नाही आणि आता…”
Just Now!
X