News Flash

Trailer : अनोळखी व्यक्तींची प्रेम कथा कैद करणारा ‘फोटोग्राफ’

या चित्रपटात सान्या आणि नवाज पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत.

फोटोग्राफ

दर्जेदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. नवाजने आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सुरुवातीला लहान लहान भूमिका साकारणारा हा कलाकार आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता झाला आहे. नवाजकडे सध्या अनेक प्रोजेक्ट असून त्याच्या आगामी फोटोग्राफी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये त्याच्यासोबत सान्या मल्होत्राही झळकली आहे.

या ट्रेलरमध्ये दोन अनोळखी व्यक्तींमध्ये खुलणाऱ्या प्रेमाची कथा सांगण्यात आली आहे. यामध्ये नवाज एका फोटोग्राफरची भूमिका साकारत असून रफी असं त्याचं नाव आहे. तर सान्याने नुरी या मुलीची भूमिका वठविली आहे.

प्रदर्शित झालेला हा ट्रेलर अडीच मिनीटांचा आहे. रफीच्या आजीला त्याच्या लग्नाची घाई झाली आहे. त्यामुळे त्या आपल्या नातसुनेचा शोध घेत आहेत. तर दुसरीकडे नवाज नुरीच्या प्रेमात पडतो. त्यानंतर नुरी आणि आजीची भेट, त्या दोघींमधील नातं या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आलं आहे.

दरम्यान, नवाजने हा ट्रेलर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. माझ्या गोड आजीच्या भेटीसाठी तिच्या सूनेला घेऊन येत आहे, असं कॅप्शन नवाजने शेअर केलेल्या पोस्टला दिलं आहे. हा चित्रपट १५ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेश बतरा दिग्दर्शित या चित्रपटाचं Sundance Film Festival मध्ये प्रीमिअर झाला असून बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्येही या चित्रपटाचं चांगलच कौतुक झालं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2019 12:18 pm

Web Title: nawazuddin siddiqui sanya malhotra photograph trailer
Next Stories
1 #BoycottKapilSharma : सिद्धूची पाठराखण करणं भोवलं, नेटकऱ्यांची कपिल शर्मावर बंदीची मागणी
2 ‘नायकचा सीक्वल यावा’, अनिलने व्यक्त केली इच्छा
3 नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X