News Flash

नवाजुद्दीन सिद्दीकीनं पत्नीच्या आरोपांवर सोडलं मौन; उचललं ‘हे’ पाऊल

नवाजुद्दीनच्या पत्नीने मागितला घटस्फोट

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीचं आयुष्य गेल्या काही दिवसांमध्ये ढवळून निघालं आहे. त्याची पत्नी आलिया हिने कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत त्याच्याकडे घटस्फोटाची मागणी केली. शिवाय ती सोशल मीडियाद्वारे सातत्याने नवाजुद्दीनवर आरोप करत होती. आलियाने इमेल आणि व्हॉट्स अॅपद्वारे ७ मे रोजी नोटीस पाठवली होती. या नोटीसला आता नवाजुद्दीनने उत्तर दिलं आहे. त्याने आपल्या पत्नी विरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे.

नवाजुद्दीनचे वकिल अदनान शेख यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला. ते म्हणाले, “आलियाने केलेले आरोप खोटे आहेत. यामागे नावजुद्दीनला केवळ बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. पुराव्यांअभावी असे कुठलेही आरोप करणं योग्य नाही. आता आम्ही तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत. तिच्यावर आम्ही मानहानीचा दावा ठोकला आहे.”

नवाजुद्दीन आणि आलिया यांच्या लग्नाला दहाहून अधिक वर्षे झाली आहेत. या दोघांना दोन मुलं आहेत. २०१७ मध्येही दोघांच्या वैवाहिक आयुष्यात चढउतार आले. मात्र अनेकदा त्यांनी घटस्फोटाचा निर्णय मागे घेतल्याचं कळतंय. ‘एबीपी न्यूज’ला दिलेल्या मुलाखती आलिया म्हणाली, “नवाजशी घटस्फोट घेण्यामागे एक नाही तर अनेक कारणं आहेत आणि ही सगळी कारणं गंभीर आहेत. लग्नाच्या एक वर्षानंतर २०१० पासून नवाज आणि माझ्यात मतभेद सुरू आहेत. मी प्रत्येक गोष्ट सांभाळून घेत होती. मात्र आता माझ्याकडून सहन होणार नाही. ” आलिया यांनी त्यांचं नाव बदलल्याचीही माहिती दिली. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी आलिया हे नाव बदलून अंजना आनंद किशोर पांडे असं नाव ठेवलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 11:23 am

Web Title: nawazuddin siddiqui sends legal notice to wife aalia mppg 94
Next Stories
1 ‘रसभरी’मधील अभिनेत्याने मुस्लिमांना धमकावल्याच्या आरोपावर स्वरा म्हणाली…
2 म्हणून चित्रपटात अभिषेक बच्चन इंटिमेट सीन देत नाही
3 सलमानने सुष्मिताच्या वेब सीरिजवर केले ट्विट, सोशल मीडियावर झाला ट्रोल
Just Now!
X