News Flash

नवाजुद्दीनच्या बहिणीने घेतला जगाचा निरोप; आठ वर्षे दिली कर्करोगाशी झुंज

पुण्यातल्या रुग्णालयात तिचे निधन झाले.

नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत त्याची बहीण सायमा तमशी सिद्दीकी

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची बहीण सायमा तमशी सिद्दीकी हिने जगाचा निरोप घेतला. कर्करोगामुळे वयाच्या २६ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. पुण्यातल्या रुग्णालयात तिचे निधन झाले. गेल्या आठ वर्षांपासून सायमा कर्करोगाशी झुंज देत होती.

नवाजुद्दीनचा भाऊ अयाझुद्दीन सिद्दीकीने सायमाच्या निधनाचे वृत्त दिले. त्याने दिलेल्या माहितीनुसार, बहिणीचं निधन झालं तेव्हा नवाजुद्दीन कामानिमित्त अमेरिकेत होता. सायमाला ब्रेस्टकॅन्सर असल्याचं नवाजुद्दीनने सोशल मीडियावर गेल्या वर्षी एक पोस्ट लिहित सांगितलं होतं.

उत्तरप्रदेशमधील बुढाणा इथं नवाजुद्दीनच्या गावी सायमाच्या पार्थिवावर रविवारी सकाळी आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2019 7:35 pm

Web Title: nawazuddin siddiqui sister dies at 26 after 8 year battle with cancer ssv 92
Next Stories
1 जितेंद्र-हेमा मालिनी विवाहबंधनात अडकणार इतक्यात धर्मेंद्र तिथे पोहोचले आणि….
2 बॉलिवूड नव्हे तर ‘हा’ दाक्षिणात्य अभिनेता आलियाला वाटतो स्टायलिश
3 कांद्याच्या किंमतीवरून ट्विंकल खन्नाचा अर्थमंत्र्यांना उपरोधिक टोला
Just Now!
X