News Flash

नवाजच्या या ‘बाळगोपाळा’वरून नजर हटत नाही

मी माझ्या मुलाच्या शाळेवर फार खूश आहे

एकीकडे राजकीय क्षेत्रात हिंदू- मुस्लिम मुद्यावरून वाद होत असताना सर्वसामान्य जनता मात्र समाजात जास्तीत जास्त शांतता कशी प्रस्थापित करता येईल याकडे लक्ष देत आहे. यात कलाकार मंडळीही मागे नाहीत. आता नवाजुद्दीन सिद्दीकीचेच पाहा ना. त्याने आपल्या दोन वर्षांच्या मुलाचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन? अनेक कलाकार आपल्या मुलांचे फोटो सतत शेअर करतच असतात. पण नवाजने शेअर केलेला हा फोटो खूपच खास आहे.

‘टॉयलेट- एक प्रेम कथा’साठी अक्षय- रणवीरने केला ‘चीप डान्स’

नवाजुद्दीनने आपला दोन वर्षाचा मुलगा ‘यानी सिद्दीकी’चा कृष्णाच्या वेशभूषेतील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. सध्या शाळांमध्ये गोपाळकालाच्या निमित्ताने अनेक समारंभ आयोजित केले जातात. यानीच्या शाळेतही असाच एक समारंभ आयोजित केला गेला होता, ज्यात त्याला नटखट कन्हैया दाखवले होते.

आपल्या मुलाचा या वेशभूषेतला फोटो ट्विटरवर शेअर करत नवाज म्हणाला की, ‘माझ्या मुलाला नटखट नंदलाल होण्याची संधी दिली यामुळे मी माझ्या मुलाच्या शाळेवर फार खूश आहे.’

नवाजुद्दीननं शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याचा मुलगा यानी कृष्णाच्या वेषभूषेत खूपच गोड दिसत असून बासरीही वाजवत आहे. हा फोटो सहा हजारांहून जास्तवेळा रिट्विट झाला असून २४ हजारांपेक्षाही जास्त लाइक्स मिळाले आहेत. नवाजुद्दीननं सर्वधर्म समभावचा संदेश दिल्याच्या प्रतिक्रिया ट्विटरकरांकडून दिल्या जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 7:39 pm

Web Title: nawazuddin siddiqui son plays krishna in school drama actor thankful for the opportunity
Next Stories
1 PHOTOS : बाबांसोबत अशी रमली सनीची चिमुकली निशा
2 संजय दत्तसाठी सनी लिओनीने केला नागिन डान्स
3 PHOTO : प्रिती आणि ऐश्वर्याच्या मैत्रीचा असा अंदाज पाहिलात का?
Just Now!
X