23 November 2019

News Flash

Father’s Day : गणेश गायतोंडेकडून अनोख्या अंदाजात शुभेच्छा

नवाजुद्दीन सिद्दीकीने 'फादर्स डे'निमित्त एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी

‘बिच्छु हैं अपनी कहानी चिपक गयी है आपको!’ असं म्हणत आपली गोष्ट सांगणारा गणेश गायतोंडे परत येतो आहे. सेक्रेड गेम्सचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजमध्ये गणेश गायतोंडेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने ‘फादर्स डे’निमित्त एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओत त्याने म्हटलंय, ‘मला तीन वडील आहेत. पहिल्याने मला भीती दाखवलीस, दुसऱ्याने धाडस दिले आणि तिसऱ्याने, ज्याला मी सर्वांत जास्त प्रेम केलं, त्याने मला धोका दिला. माझ्या तिन्ही वडिलांना मला एकच गोष्ट सांगायची आहे, हॅप्पी फादर्स डे!’ या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘पापा कहते है बडा नाम करेगा, गणेश हमारा ऐसा काम करेगा.’

सेक्रेड गेम्सच्या पहिल्या भागांमध्ये असलेल्या कथानक, तगडे कलाकार, अभिनय, संवाद आणि सिनेमॅटीक लिबर्टीच्या बळावर पहिल्या भागाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या वेब सीरिजमधून साकारलेल्या प्रत्येक पात्रांची प्रेक्षकांवर भुरळ पडली आहे. त्यामुळेच या सीरिजचा एक वेगळा चाहतावर्ग तयार झाला आहे. त्रिवेदी का वाचणार? ताबुत काय असतो? अशा अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं नव्या सीझनमध्ये मिळण्याची शक्यता आहे.

First Published on June 16, 2019 5:59 pm

Web Title: nawazuddin siddiqui special video on fathers day ssv 92
Just Now!
X